August 9, 2025 10:56 AM August 9, 2025 10:56 AM
1
GeMच्या सकल व्यवसाय मुल्याचा या आर्थिक वर्षात साडेपाच लाख कोटी रुपयांचा टप्पा पार
केंद्र सरकारच्या ई मार्केटप्लेस अर्थात GeMच्या सकल व्यवसाय मुल्यानं 2024-25 या आर्थिक वर्षात साडेपाच लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. अशी माहिती जीईएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिहीर कुमार यांनी काल दिली. विपणनाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या या पोर्टलचा 9व्या स्थापना दिनानिमित्त नवीदिल्लीइथंआयोजित कार्यक्रमांत ते बोलत होते.शासनाच्या प्रक्रियांना सर्वसमावेशक बनवणं आणि परिणामकारकरित्या अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवणं हा यामागील उद्देश असल्याचं ते म्हणाले.