December 11, 2024 1:20 PM December 11, 2024 1:20 PM

views 4

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासियांना गीताजयंतीच्या शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना गीताजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरा यांना मार्गदर्शन करणाऱ्या शास्त्राचा निर्मिती दिवस म्हणून  आजचा पवित्र  दिवस साजरा केला जातो, असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यावेळी प्रधानमंत्र्यांनी भगवान कृष्णाचं स्मरण केलं आणि भगवद गीता सर्वांना कर्मयोगाचा मार्ग दाखवेल अशी आशा व्यक्त केली.