September 3, 2024 6:49 PM

views 16

जागतिक बँकेनं चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज ७ टक्क्यांपर्यंत वाढवला

जागतिक बँकेनं २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज ७ टक्क्यापर्यंत वाढवला आहे. याआधी जागतिक बँकेनं ६ पूर्णांक ६ दशांश टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता खासगी गुंतवणुकीसारख्या महत्त्वाच्या घटकांमुळे भारताची आर्थिक वाढ मजबूत राहील, असं बँकेनं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंही भारताच्या जीडीपी अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा सुधारित अंदाज दिला आहे, त्यानुसार ही वाढ ७ टक्के राहिल.

August 30, 2024 8:07 PM

views 17

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा प्रत्यक्ष जीडीपी दर ६.६ टक्के

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, देशाचा प्रत्यक्ष जीडीपी अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा अनुमानित दर ६ पूर्णांक ६ दशांश टक्के आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं आज जाहीर केलेल्या अहवालात हे अनुमान दिलं आहे. चलनफुगवटा विचारात न घेता, मोजलेला नॉमिनल जीडीपी वाढीचा दर या तिमाहीत ९ पूर्णांक ७ दशांश टक्के राहिला. तर एकूण मूल्यवर्धन या तिमाहीत ६ पूर्णांक ८ दशांश टक्क्यांनी वाढलं.

July 22, 2024 7:15 PM

views 22

२०२४-२५ वर्षासाठी स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर साडेसहा ते सात टक्के राहण्याचा अंदाज

२०२३-२४ च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात आर्थिक वर्ष २०२४-२५ वर्षासाठी स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर साडे सहा ते सात टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. जागतिक स्तरावर आर्थिक कामगिरीत अनिश्चितता असताना  आर्थिक वर्ष २०२३-२४ ​​मध्ये देशांतर्गत वाढीला चालना देणाऱ्या घटकांमुळे आर्थिक वाढीला मदत मिळाली असल्याचं अहवालात म्हटलं आहे.  रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष २०२५ साठी चलनफुगवट...

July 17, 2024 2:00 PM

views 26

भारताचा जीडीपी वाढीचा दर ७ टक्के राहील, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चालू आर्थिक वर्ष २०२४-२०२५ साठी भारताच्या आर्थिक वाढीचा दर वीस शतांशांनी वाढून ७ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यातही नाणेनिधीने आपल्या वर्ल्ड इकोनॉमिक आऊटलूकमध्ये भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचा अंदाज ३० शतांशांनी वाढवून ६ पूर्णांक ८ दशांश टक्के केला होता.   संस्थेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या निरीक्षणात, भारताच्या ग्रामीण भागात खासगी खर्चामध्ये वाढ होण्याच्या शक्यतेमुळे हा अंदाज वर्तवला आहे. यामुळे भारत ही जगातली सर्वात वेगवान व...