February 20, 2025 7:30 PM

views 24

पुण्यात २ जीबीएस रुग्णांचा मृत्यू

पुणे शहरात आणखी दोन रुग्णांचा गुलियन बॅरे सिन्ड्रोम या आजारानं मृत्यू झाला आहे. या आजारानं आता पर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 211 जणांना जीबीएसचं निदान झालं आहे.

February 16, 2025 8:21 AM

views 25

पुण्यात जीबीएसचे २०८ रुग्ण

पुणे विभागात गुइलेन बॅरे सिंड्रोम म्हणजे जीबीएस चे आतापर्यंत २०८ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये प्रामुख्यानं कॅम्पायलो-बॅक्टर जेजुनी आणि नोरोव्हायरसचा संसर्ग आढळून आला असून, हेच जीबीएस उद्रेकाचं कारण असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागानं दिली आहे.   या रुग्णांपैकी 42 रुग्ण पुणे महापालिका हद्दीतले, 94 रुग्ण पुणे महापालिकेत नव्यानं समाविष्ट केलेल्या गावांमधले, 30 पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतले तर 32 पुणे ग्रामीण भाग आणि 10 रुग्ण इतर जिल्ह्यातले आहेत. सिंहगड रस्ता परिसरात आढळलेले ...

February 14, 2025 3:15 PM

views 28

कोल्हापूरमध्ये जीबीएसग्रस्त महिला रुग्णाचा मृत्यू

कोल्हापूरच्या चंदगड इथं गुईलेन बॅरे सिंड्रोमग्रस्त महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या महिलेवर गेल्या काही दिवसांपासून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरू होते. या आजारामुळं राज्यात झालेला हा ९वा मृत्यू आहे. राज्यात गुईलेन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.

February 11, 2025 7:26 PM

views 20

राज्यात जीबीएसच्या आणखी एकाचा मृत्यू

राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात काल 37 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात या आजाराने आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यातील जीबीएस रुग्णसंख्या 192 झाली आहे.

January 31, 2025 7:19 PM

views 15

राज्यात जीबीएस आजारामुळे ४ जणांचा मृत्यू

गुइलेन बॅरे आजाराचं निदान झालेल्या दोन रुग्णांचा आज पुण्यात मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात या आजारानं मरण पावलेल्यांची संख्या आता ४  झाली आहे.  आज मृत पावलेल्यांमध्ये एका टॅक्सी चालकाचा आणि एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. राज्यात गुइलेन बॅरे आजाराच्या संशयित रुग्णांची संख्या १३० वर पोहोचली असून यापैकी २० रुग्ण जीवरक्षक प्रणालीवर उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.

January 31, 2025 3:48 PM

views 16

अकोल्यात जीबीएसचे ४ रुग्ण

पुण्यात आढळून आलेल्या जीबीएस अर्थात गुइलेन-बॅरे सिंड्रोम या दुर्मिळ आजाराचे रुग्ण आता अकोल्यातही आढळून आले आहेत. अकोल्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात जीबीएस सिंड्रोमच्या ४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील १ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून उपचार घेणाऱ्या चारही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

January 29, 2025 9:40 AM

views 20

कोल्हापूर, लातूरमध्ये जीबीएसचे रुग्ण

कोल्हापूर जिल्ह्यातही जीबीएसचे दोन रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एका १२ वर्षीय मुलीचा आणि ६० वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. दोन्ही रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याचं, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ एस एस मोरे यांनी सांगितलं.   लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही जीबीएसचे दोन संशयित रुग्ण दाखल झाले होते. तपासणी अहवालात एका रुग्णाला हा संसर्ग नसल्याचं स्पष्ट झालं असून, दुसऱ्या रुग्णाचा अहवाल येणं बाकी आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.उदय मोहिते पा...

January 29, 2025 9:37 AM

views 22

सोलापूरमध्ये जीबीएसचे ५ संशयित रुग्ण

सोलापूर जिल्ह्यात जीबीएस आजाराचे पाच संशयित आढळून आले आहेत. त्यापैकी चौघांवर उपचार सुरु असून, एकाचा मृत्यू झाला आहे. उपचार सुरू असलेले चार ही रुग्ण लातूर, निलंगा, तसंच अणदूर या ठिकाणचे आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही माहिती दिली. काल पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, नागरिकांनी घाबरुन न जाता, आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचं पालन करुन योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन केलं.