October 13, 2025 10:23 AM October 13, 2025 10:23 AM

views 105

गाझा शांतता कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी आज इजिप्तमध्ये शिखर परिषद

गाझा युद्ध संपवण्याच्या पार्श्वभूमीवर, शांतता कराराला अंतिम रूप देण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आज इजिप्तच्या शर्म एल-शेख इथं होत आहे. यावेळी गाझा पट्टीतील युद्ध थांबवण्यावर, तसंच पश्चिम आशियातली  सुरक्षितता आणि स्थैर्य या मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फत्ताह अल-सिसी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या  बैठकीचे सहअध्यक्षपद भूषावणार आहेत.   संयुक्त राष्ट्रांचे  महासचिव अँटोनियो गुटेरेस देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्य...