October 10, 2025 9:47 AM October 10, 2025 9:47 AM
99
गाझा शांतता कराराला मान्यता दिल्याबद्दल प्रधानमंत्री मोदींकडून अमेरिका-इस्रायलचं कौतुक
गाझा शांतता कराराला मान्यता दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांचं अभिनंदन केलं आहे. ओलिसांची सुटका, इस्रायली सैन्याची माघार घेण्याचा आणि गाझाला मानवतावादी मदत साहित्याचा पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. नेतान्याहू यांच्याशी काल झालेल्या दूरध्वनीवरील संभाषणा नंतर समाज माध्यमावरील संदेशात मोदींनी ही माहिती दिली. दहशतवादाविरुद्ध भारताची ठाम भूमिका यावेळी त्य...