August 27, 2025 6:33 PM August 27, 2025 6:33 PM

views 2

गाझा हल्ल्यात पत्रकारांच्या मृत्यूवर भारताची निषेधार्ह प्रतिक्रिया

इस्रायलाने गाजामधील खान युनुस इथ केलेल्या हल्ल्यात पत्रकारांचे झालेले मृत्यू धक्कादायक आणि निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया भारताने दिली आहे. संघर्षात नागरिकांचे मृत्यू होणे निंदनीय असल्याची भूमिका भारत नेहमीच घेत आला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.   हल्यात पत्रकारांचे मृत्यू झाल्याच्या घटनेची चौकशी सुरु असल्याचं इस्रायली अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

June 2, 2025 2:44 PM June 2, 2025 2:44 PM

views 6

हमासच्या राफा इथं झालेल्या गोळीबारात ३० जण ठार, तर १७९ जखमी

हमासच्या राफा इथं अन्न साहाय्य वितरण केंद्राजवळ झालेल्या गोळीबारात ३० पेक्षा अधिक लोक ठार तर १७९ लोक जखमी झाले आहेत. इजरायली सैन्यानं आणि अमेरीका आधारित गाझा मानवतावादी फाऊंडेशननं हिंसेच्या या दाव्यांना नकार दिला आहे. दरम्यान हमासनं गाझा शस्त्रसंधी करारावर ताबडतोब नवीन अप्रत्यक्ष चर्चा सुरू करण्याची आपली तयारी जाहीर केली आहे.

March 27, 2025 1:28 PM March 27, 2025 1:28 PM

views 3

इस्रायली सैन्याने गाझापट्ट्यात हवाई आणि जमिनीवरचे हल्ले वाढवले

इस्रायली सैन्याने गाझापट्ट्यात हवाई आणि जमिनीवरचे हल्ले वाढवले असून १८ मार्चपासून ते आजपर्यंत ४३०हून अधिक ठिकाणांवर हल्ले झाल्याचं हमासच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. या हल्ल्यांमुळे दोन महिन्यांच्या युद्धबंदी कराराचं उल्लंघन झाल्याचंही हमासने म्हटलं आहे.   या हल्ल्यांमध्ये सुमारे ८३० जणांचा मृत्यू झाल्याचं गाझाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं असून या काळात कोणत्याही इस्रायली नागरिकाच्या मृत्युची नोंद नसल्याचंही म्हटलं आहे.   इस्रायलनेही गाझापट्ट्यातून येणारी १४ क्षेपणास्त...

January 4, 2025 2:40 PM January 4, 2025 2:40 PM

views 5

गाजा पट्टीत संपूर्ण संघर्षविराम व्हावा, यासाठी कतारच्या दोहामध्ये इस्रायलबरोबर अप्रत्‍यक्ष चर्चा सुरु

गाजा पट्टीत संपूर्ण संघर्षविराम व्हावा, यासाठी कतारच्या दोहामध्ये इस्रायलबरोबर अप्रत्‍यक्ष चर्चा सुरु झाली आहे. हमासनं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. व्‍यापक आणि अस्‍थायी संघर्ष विराम तसंच गाजामधून इस्रायली सैनिकांची माघार हे मुद्दे या चर्चेच्या केंद्रस्थानी असतील. विस्थापित पॅलेस्टिनी नागरिकांना त्वरित आणि सुरक्षितपणे माघारी आणण्याबद्दलही चर्चा होणार आहे. या चर्चेसाठी आपलं शिष्टमंडळ दोहा इथे पाठवल्याचं इस्राएलनं म्हटलं आहे. कतार, इजिप्त आणि अमेरिकेच्या मध्यस्थीतून गेल्या एक वर्षापासून संघर्ष विरा...

November 3, 2024 2:16 PM November 3, 2024 2:16 PM

views 10

इस्राइलचं हवाई दल आणि तोफखान्यानं केलेल्या हल्ल्यात ४२ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू

इस्राइलचं हवाई दल आणि तोफखान्यानं केलेल्या हल्ल्यात ४२ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून दीडशेहून अधिक जण जखमी झाले. मध्य गाझातल्या नुसेईरत विस्थापित छावणीवर शुक्रवारी सकाळपासून हा हल्ला सुरू होता. गाझामधल्या नागरिकांवर हल्ले करु नये यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं इस्राइलवर दबाव टाकावा, असं आवाहन गाझातल्या सरकारनं केलं आहे. राफा आणि मध्य गाझामध्ये दहशतवाद्यांना ठार करणं, त्यांची ठिकाणं आणि शस्र उद्ध्वस्त करण्यासाठी हे हल्ले केल्याचं इस्राइली सुरक्षा दलानं म्हटलं आहे.