December 30, 2025 8:31 PM December 30, 2025 8:31 PM

views 8

इस्राइलचे गाझा पट्टीतल्या अनेक भागात तोफगोळे आणि हवाई हल्ले

इस्राइलनं आज गाझा पट्टीतल्या अनेक भागात तोफगोळे आणि हवाई हल्ले केले. १० ऑक्टोबरला झालेल्या शस्त्रसंधीचं हे उल्लंघन असल्याचं गाझातल्या प्रशासनानं म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कालच इस्राइलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यानू यांची भेट घेऊन शस्त्रसंधीच्या पुढच्या टप्प्याची चर्चा केली होती. यावेळी नेत्यानू यांनी इस्राइलचा पहिला शांतता पुरस्कार ट्रम्प यांना जाहीर झाल्याची घोषणा केली होती.

December 3, 2025 6:17 PM December 3, 2025 6:17 PM

views 14

गाझाचं मुख्य प्रवेशद्वार येत्या काही दिवसात उघडण्यात येणार

गाझाचं मुख्य प्रवेशद्वार येत्या काही दिवसात उघडण्यात येणार असून यामुळे वैद्यकीय मदतीची गरज असलेल्यांना इजिप्तमार्गे बाहेर पडता येईल, असं इस्रायलनं म्हटलं आहे. रफाह सीमा खुली करण्यासाठी इजिप्तशी चर्चा सुरू असून युरोपियन युनियन मिशनच्या देखरेखीखाली या वाटाघाटी सुरू आहेत, असं इस्रायलची लष्करी शाखा को गॅट ने म्हटलं आहे. इस्रायलने ऑक्टोबरपासून रफाह शहराच्या दोन्ही सीमा बंद केल्या आहेत.

November 18, 2025 1:40 PM November 18, 2025 1:40 PM

views 18

गाझापट्टीत शांतता आणि पुनर्निर्माणासाठी अमेरिकेच्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मंजुरी

गाझापट्टीत शांतता प्रस्थापित करणं आणि उद्ध्वस्त झालेल्या भागांचं पुनर्निर्माण करण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पारीत झाला आहे. १५ सदस्यीय परिषदेत १३ जणांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं तर रशिया आणि चीनने मतदानात सहभाग घेतला नाही. या प्रस्तावानुसार आता शांतता समितीची तसंच आंतरराष्ट्रीय स्थैर्य दलाची स्थापना केली जाईल.   शांतता समितीचं अध्यक्षपद आपण भूषवणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं.  आंतरराष्ट्रीय स्थैर्य दलामधे विविध देशांच...

October 29, 2025 1:33 PM October 29, 2025 1:33 PM

views 30

इस्रायलनं गाझावर केलेल्या हल्ल्यात ३३ पॅलेस्टिनी नागरिक ठार

इस्रायलनं गाझावर आज केलेल्या हल्ल्यात किमान ३३ पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले.  हमासनं गाझात इस्राएली सैनिकांवर हल्ला केल्यावर आणि मरण पावलेल्या ओलिसांचे मृतदेह परत देण्याचं नाकारल्यावर हे पाऊल उचलल्याचं इस्राएलचे संरक्षण मंत्री इस्राएल कात्झ यांनी सांगितलं. हमासनं हे आरोप फटाळून लावले आहेत. इस्राएलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी या हल्ल्याचे आदेश सैन्याला दिले असल्याची माहिती अमेरिकेला दिली होती असं अमेरिकेच्या सूत्रांनी सांगितलं.

October 14, 2025 1:18 PM October 14, 2025 1:18 PM

views 57

गाझा पट्टीतला संघर्ष थांबवून शांतता प्रस्थापित करण्याबाबतच्या जाहीरनाम्यावर स्वाक्षऱ्या

गाझा पट्टीत गेली दोन वर्ष सुरु असलेला संघर्ष थांबवून शांतता प्रस्थापित करण्याबाबतच्या जाहीरनाम्यावर अमेरिकेचे अध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प, इजिप्त आणि तुर्कीएचे अध्यक्ष आणि कतारचे अमीर यांनी काल इजिप्त मध्ये शर्म अल-शेख इथं स्वाक्षरी केली. यावेळी ३०पेक्षा जास्त देशांचे नेते आणि प्रतिनिधी उपस्थित होते.     या शांतता शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प,  इजिप्तचे अध्यक्ष  अब्देल-फत्ताह अल-सिसी, तुर्कीएचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी, यांनी हमास-इ...

October 7, 2025 9:43 AM October 7, 2025 9:43 AM

views 43

इस्राइल आणि हमासच्या अधिकाऱ्यांची इजिप्तमध्ये चर्चा सुरू

गाझामधला संघर्ष थांबवण्याबाबत अमेरिकेनं तयार केलेल्या आराखड्यावर इस्राइल आणि हमासच्या अधिकाऱ्यांची इजिप्तमध्ये चर्चा सुरू आहे. पॅलेस्टाइनच्या कैद्यांची आणि इस्राइलच्या ओलिसांची मुक्तता करण्यावर या चर्चेत भर दिला जात आहे. विशिष्ट अटींची पूर्तता झाल्यावर इस्राइलच्या सर्व ओलिसांना सोडण्याची तयारी असल्याचं हमासनं म्हटलं आहे. मात्र सैन्यमाघारी आणि गाझामधल्या राजकारणातला सहभाग याबाबत हमासनं आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

October 6, 2025 1:00 PM October 6, 2025 1:00 PM

views 23

इस्रायलनं गाझावर केलेल्या हल्ल्यात ६५ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू

इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात गेल्या चोवीस तासात ६५ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर १५३ जण जखमी झाले आहेत. इस्रायली हल्ल्यात आतापर्यंत  ६७ हजार १३९ जणांचा मृत्यू झाला असून १ लाख ७० हजार जण जखमी झाल्याचं गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. संघर्ष सुरू झाल्यापासून उपासमारीने ४६० जणांनी प्राण गमावल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. गाझापट्टीतील संघर्ष थांबवण्याबाबत चर्चा सुरू असतानाही गेल्या ४८ तासात इस्रायलने १३० हून अधिक  हवाई हल्ले केल्याचं वृत्त आहे.

September 30, 2025 9:30 AM September 30, 2025 9:30 AM

views 28

अमेरिकेकडून गाझा शांतता नियोजन आराखडा प्रकाशित

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यात झालेल्या बैठकीनंतर अमेरिकेनं गाझा पट्टीत शांतता स्थापन करण्याबाबतचा नियोजन आराखडा प्रकाशित केला. गाझा पट्टीला दहशतवादमुक्त करुन तिथल्या लोकांच्या फायद्यासाठी या भागाचा पुनर्विकास केला जाईल. दोन्ही बाजूंनी या प्रस्तावाला मान्यता दिल्यास युद्ध तत्काळ थांबवण्यात येईल असं या आराखड्यात म्हटलं आहे.   हा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर सर्व लष्करी कारवाया थांबवून सैन्य मागं घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल तसंच परस्पर...

September 18, 2025 1:26 PM September 18, 2025 1:26 PM

views 15

इस्राएलची गाझा शहरातून नागरिकांना बाहेर काढण्याची मोहीम सुरु

इस्राएलनं हमासच्या अतिरेक्यांचा सामना करण्यासाठी गाझा शहरातून नागरिकांना बाहेर काढण्याची मोहीम सुरु केली असून, पॅलेस्टिनी नागरिकांना शहरातून बाहेर जाण्यासाठी  ४८ तासांचा अतिरिक्त मार्ग खुला केल्याची माहिती इस्रायली लष्करानं काल दिली.    गाझा शहरात हजारो नागरिकांनी आश्रय घेतला असून, शहर सोडल्यावर पुढे येणारी संकटं, तसंच अन्नाचा तुटवडा आणि कायमचं विस्थापित होण्याची भीती, यामुळे शहर सोडून जायला ते घाबरत आहेत.    गाझा पट्ट्यात काल इस्राएलनं केलेल्या हल्ल्यात जवळजवळ ६३ नागरिक मृत्युमुखी पडल...

August 21, 2025 1:24 PM August 21, 2025 1:24 PM

views 19

गाझा शहरावर ताबा घेण्यासाठी लष्करी कारवाई सुरु केल्याची इस्रायलची घोषणा

गाझा शहरावर ताबा घेण्यासाठी आपण पहिल्या टप्प्यातली लष्करी कारवाई सुरु केल्याचं इस्रायलच्या लष्करानं एका निवेदनाद्वारे घोषित केलं आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी काल या निर्णयाला मंजुरी दिली असून, या आठवड्याच्या अखेरीला इस्रायलच्या सुरक्षा मंत्रिमंडळाकडून त्याचा आढावा घेतला जाईल, असं यात म्हटलं आहे.   गाझावर मोठा हल्ला करण्याच्या दृष्टीनं शहराबाहेर, विशेषतः झीटौन आणि जबालिया भागात आपलं लष्कर यापूर्वीच कार्यरत झालं असून, या कारवाईसाठी ६० हजार राखीव सैनिकांना तैनात केल्याचं य...