December 1, 2024 7:12 PM December 1, 2024 7:12 PM
7
अमेरिकेत कथित लाचखोरी प्रकरणी केल्या गेलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा उद्योगपती गौतम अदानी यांचा दावा
अमेरिकेत कथित लाचखोरी प्रकरणी केल्या गेलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा दावा उद्योगपती गौतम अदानी यांनी केला आहे. जयपूर इथं आयोजित एका पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. आपल्या कंपनीने कोणत्याही प्रकारे नियमांचं उल्लंघन केलेलं नसून अशा प्रकारचे आरोप होण्याची ही पहिली वेळ नाही, असं अदानी यावेळी म्हणाले. अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीवर सौरप्रकल्पासाठी २ हजार २५० कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेत न्यूयॉर्क इथल्या न्यायालयात झाला आहे. मात्र, अदानी समुहाने हे आरोप फेटाळले आहेत.