April 12, 2025 2:41 PM April 12, 2025 2:41 PM

views 8

ग्लाइड बॉम्ब गौरवची चाचणी यशस्वी

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं सुखोई-30 एमकेआय विमानातून लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्ब गौरवची यशस्वी चाचणी काल घेतली. या चाचणीत सुमारे १०० किलोमीटरचा पल्ला अचूकपणे पार केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली. गौरव हा एक हजार किलो ग्रॅम वजनाचा ग्लाइड बॉम्ब असून चंडीपूर इथल्या संशोधन केंद्रात तो विकसित केला आहे.

April 11, 2025 8:02 PM April 11, 2025 8:02 PM

views 12

‘DRDO’ नं घेतली ‘गौरव’ या दीर्घ पल्ल्याच्या बॉम्बची यशस्वी चाचणी

डी आर डी ओ नं गौरव या दीर्घ पल्ल्याच्या बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली. सुखोई विमानातून डागलेल्या या बॉम्बनं १०० किलोमीटर अंतरावर अचूक मारा केल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अधिकाऱ्यांसह उद्योगक्षेत्राचं अभिनंदन केलं आहे.