January 1, 2025 1:51 PM

views 22

व्यावसायिक वापराचं गॅस सिलिंडर १५ रुपयांनी स्वस्त, घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किंमती जैसे- थे

पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापराचे गॅस सिलिंडर १५ रुपयांनी स्वस्त केलं आहे. मुंबई आता १९ किलो वजनाचं LPG सिलेंडर १ हजार ७५६ रुपयांना मिळेल. घरगुती वापराचे LPG सिलिंडरच्या किंमतीत मात्र काहीही बदल झालेला नाही. त्यामुळं हे सिलिंडर ८०२ रुपये ५० पैशांना मिळेल.

July 30, 2024 7:28 PM

views 17

महिलांसाठी खुशखबर ! तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत

सरकारनं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला असून आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये आर्थिक सहाय्यासोबतच वर्षभरासाठी तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागा अंतर्गत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणं आवश्यक आहे.