October 31, 2024 2:59 PM October 31, 2024 2:59 PM
9
नवी मुंबईत गॅस सिलिंडरच्या स्फोटात तीन जणांचा मृत्यू
नवी मुंबईतल्या उलवे इथं काल संध्याकाळी उशिरा तीन गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एका दुकान आणि घराला लागलेल्या भीषण आगीत एका कुटुंबातल्या तीन जणांचा मृत्यू झाला. दुकानाचा मालक गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्याची पत्नी आणि दोन मुलांचा दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.