November 1, 2025 3:35 PM November 1, 2025 3:35 PM
48
देशभरात व्यावसायिक वापराच्या गॅसच्या किंमतीत घट
देशभरात व्यावसायिक वापराच्या गॅसच्या किंमतीत आजपासून घट झाली आहे. घरगुती वापराच्या १४ किलो २०० ग्रॅम वजनाच्या एल पी जी सिलेंडरच्या किंमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही. व्यावसायिक वापराच्या १९ किलो वजनाच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत साडे चार ते साडे सहा रुपयांपर्यंत घट झाली असून यानुसार आता दिल्लीत या सिलेंडरची किंमत १ हजार ५९० रुपये ५० पैसे असेल, मुंबईत हा सिलेंडर १ हजार ५४२ रुपयांना मिळेल. कोलकाता इथं सर्वाधिक साडे सहा रुपयांची घट झाली असून तिथं सिलेंडरची किंमत १ हजार ६९४ रुपये तर चेन्नई...