November 27, 2024 4:03 PM November 27, 2024 4:03 PM
15
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा देशातल्या ८० कोटी लोकांना लाभ
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत देशातल्या ८० कोटी लोकांना लाभ झाला असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री निमुबेन बांभनिया यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. गरीब लाभार्थ्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी विनामूल्य अन्नधान्य वितरणाचा कालावधी जानेवारी २०२४ नंतर पाच वर्षांसाठी वाढवण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं.