September 18, 2024 3:02 PM September 18, 2024 3:02 PM
4
राज्यात गणेशोत्सवाच्या पर्वाची गणेश विसर्जनाने सांगता
णेशोत्सवाच्या चैतन्यपर्वाची काल गणेश विसर्जनानं सांगता झाली. राज्यात सर्वत्र ढोल ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालात, गुलालाची उधळण करत आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत, भाविकांनी लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला. दहा दिवसांच्या घरगुती गणेश मूर्तींचंही विसर्जन काल करण्यात आलं. मुंबईत मोठ्या गणेशमूर्तींचं विसर्जन आज सकाळपर्यंत सुरु होतं. मुंबईत गणेशोत्सवाची सांगता दरवर्षीप्रमाणे उत्साहात झाली. अनंतचतुर्दशीच्या दिवशी शहरातले समुद्रकिनारे लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी आलेल्या गर्दीने फु...