September 18, 2024 7:12 PM September 18, 2024 7:12 PM

views 14

पुणे शहरात एकंदर तीन लाख ७४ हजार १४८ गणेश मूर्ती विसर्जित

पुणे शहरात एकंदर तीन लाख ७४ हजार १४८ गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. पुणे महापालिकेतर्फे गणेश विसर्जनासाठी बांधण्यात आलेल्या ४५  हौदांमध्ये एक लाख १ हजार २८१ मूर्तींचं तर ५१६ लोखंडी टाक्यात एकंदर दोन लाख ८२ हजार ६०४ मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. महापालिकेनं मूर्ती दान करण्यासाठी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून २३९ ठिकाणी उभारलेल्या मूर्ती संकलन केंद्रात एक लाख ७६ हजार ६७ मुर्ती दान करण्यात आल्या आहेत. घनकचरा विभागाचे प्रमुख आणि महापालिकेचे उपायुक्त संदीप कदम यांनी आज पत...

September 18, 2024 7:10 PM September 18, 2024 7:10 PM

views 15

गणेशविसर्जनानंतर विविध चौपाट्या, समुद्रकिनाऱ्यांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विशेष स्वच्छता मोहीम

गणेशविसर्जनानंतर विविध चौपाट्या, समुद्रकिनाऱ्यांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेद्वारे दोन दिवसांत ३६३ मेट्रिक टन घन कचरा संकलित करण्यात आला. तसंच, सार्वजनिक आणि कृत्रिम विसर्जनस्थळांवरचं निर्माल्य गोळा करण्यासाठी यंदा महानगरपालिकेनं ५०० निर्माल्य कलश आणि ३५०पेक्षा जास्त वाहनं उपलब्ध करून दिली होती. त्यातून सुमारे ५५० मेट्रिक टन निर्माल्य संकलित झालं असल्याची माहिती महानगरपालिकेनं दिली आहे. हे निर्माल्य ३७ सेंद्रीय खत निर्मिती प्रकल्पांमध्ये...

September 18, 2024 3:22 PM September 18, 2024 3:22 PM

views 9

गणेशविसर्जनाच्या वेळी ८ जणांचा मृत्यू

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान राज्यभरात विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. धुळे शहराजवळ चितोड गावात विसर्जनाच्या मिरवणुकीत ट्रॅक्टरखाली आल्यानं काल तीन बालकांचा मृत्यू झाला, तर इतर सहा जण जखमी झाले. धुळे शहरात काल संध्याकाळी दोन सख्ख्या भावांचा पांझरा नदीत बुडून मृत्यू झाला. नाशिकजवळच्या पाथर्डी इथं नदीत गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला तर अन्य एका घटनेत चुंचाळे गावाजवळ एक जण डोहात बुडाला. त्याचा शोध सुरू आहे. अमरावतीच्या ईसापूर शहापूर इथं गणप...

September 17, 2024 6:59 PM September 17, 2024 6:59 PM

views 13

राज्यात सर्वत्र गणेशविसर्जनाचा उत्साह

भाद्रपद महिन्यात गणेशचतुर्थी पासून सुरु झालेल्या गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे. त्यामुळं लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी येण्याचं आमंत्रण देत वाजत गाजत निरोप देण्याची चढाओढ राज्यात सर्वत्र दिसून येते आहे. मुंबईत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सकाळपासून विसर्जन मिरवणुका काढण्यात येत आहेत. ढोल ताशा लेझीम आणि बाजाच्या संगीतावर उत्फुल्लपणे सर्वजण गुलालाची, फुलांची उधळण करीत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. लालबागचा राजा, तेजुकाया मॅन्शन, गणेशगल्ली इत्यादी प्रसिद्ध मंडळांच्या महाकाय मूर्ती ...

September 17, 2024 6:57 PM September 17, 2024 6:57 PM

views 9

राज्यात ठिकठिकाणी मिरवणुका काढत लाडक्या गणरायाला भक्तांचा निरोप

पुणे शहरातल्या कसबा पेठ आणि तांबडी जोगेश्वरी या मानाच्या दोन गणपतींचं विसर्जन झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज ३७ हजार ८०५ खासगी, तर ६६ सार्वजनिक गणपतींचं विसर्जन होत आहे. धुळे जिल्ह्यात ४१६ मंडळांकडून गणेश विसर्जन करण्यात येत आहे. यात ३९२ सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचा समावेश आहे. १३ खासगी तर ११ ठिकाणी एक गाव एक गणपतीचे विसर्जन करण्यात येत आहे.  बुलढाणा जिल्ह्यात आज सकाळपासून गणेश विसर्जन सुरू असून शेगावमध्ये झालेले किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र मिरवणुका शांततेत सुरू आहेत. वाशिम शहरात सकाळपा...

September 13, 2024 9:12 AM September 13, 2024 9:12 AM

views 14

राज्यभरात गौरी गणपतींना भावपूर्ण निरोप

राज्यभरात घरोघरी विराजमान झालेल्या गणपतीबाप्पांचं आणि माहेरवाशिणी गौरीचं काल भावपूर्ण वातावरणात आणि 'पुढच्या वर्षी लवकर या' असा आग्रह धरत विसर्जन करण्यात आलं. गणेश विसर्जनसाठी राज्यात सर्वत्र प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. पुण्यात महापालिकेनं 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 42 बांधीव हौद आणि 265 ठिकाणी 568 लोखंडी टाक्यांमध्ये व्यवस्था केली आहे. नागरिकांनी नदी, तलाव अशा नैसर्गिक स्त्रोतांमध्ये मूर्तींचं विसर्जन करु नये, असं आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख आणि उपायुक्त संदीप कदम यांनी के...