August 28, 2025 7:02 PM August 28, 2025 7:02 PM

views 17

राज्यभरात ठिकठिकाणी दीड दिवसांच्या गणपतीच्या विसर्जन

दीड दिवसांच्या मंगलमूर्तींचं आज विसर्जन होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं यंदा २७५ हून अधिक कृत्रिम तलाव उभारले आहेत. यंदा ५०० हून अधिक निर्माल्य कलश विसर्जन स्थळांवर उपलब्ध करण्यात आले आहेत. आज दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबईत ५७५ घरगुती तर ३ सार्वजनिक गणेशमूर्तींचं विसर्जन झालं. नवी मुंबईत नैसर्गिक 22 विसर्जन स्थळांव्यतिरिक्त विविध विभागांमध्ये 143 इतक्या मोठ्या संख्येने कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात आलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज दुपारपासून दीड दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनाला सुर...

August 27, 2025 3:53 PM August 27, 2025 3:53 PM

views 20

गणेशोत्सवानिमित्त राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

१० दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून घरोघरी तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधे गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होत आहे. यंदा गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे उत्साह द्विगुणित झालेला दिसत आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुंबईत राजभवन इथं गणेशमूर्तीची प्रतिस्थापना करुन पूजा - आरती केली. यावेळी राजभवनातले अधिकारी, कर्मचारीही सहभागी झाले. यंदाची राजभवनातली शाडूची मूर्ती नाशिक कारागृहातल्या कैद्यांनी तयार केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत वर्षा नि...

August 26, 2025 2:48 PM August 26, 2025 2:48 PM

views 4

राज्यात सर्वत्र गणरायाच्या स्वागताची तयारी उत्साहात सुरू

 १० दिवस चालणाऱ्या  गणेशोत्सवाला उद्यापा्सून सुरुवात होणार असून गणरायाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी होत आहे. महाराष्ट्रात यंदा गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे उत्साह द्विगुणित झालेला दिसत आहे आणि त्याच्या तयारीला वेग आला आहे.    गणरायाच्या आगमनाच्या आदल्या दिवशी आज घरोघरी हरतालिका पूजन  झालं. उद्या सर्वत्र सार्वजनिक आणि घरगुती गणेशमूर्तींची वाजतगाजत स्थापना होईल. मुंबईत दरवर्षी दहा हजारापेक्षा जास्त सार्वजनिक आणि दोन लाखांपेक्षा जास्त घरगुती गणपतींची स्थापना केली जाते....

September 17, 2024 6:59 PM September 17, 2024 6:59 PM

views 13

राज्यात सर्वत्र गणेशविसर्जनाचा उत्साह

भाद्रपद महिन्यात गणेशचतुर्थी पासून सुरु झालेल्या गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे. त्यामुळं लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी येण्याचं आमंत्रण देत वाजत गाजत निरोप देण्याची चढाओढ राज्यात सर्वत्र दिसून येते आहे. मुंबईत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सकाळपासून विसर्जन मिरवणुका काढण्यात येत आहेत. ढोल ताशा लेझीम आणि बाजाच्या संगीतावर उत्फुल्लपणे सर्वजण गुलालाची, फुलांची उधळण करीत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. लालबागचा राजा, तेजुकाया मॅन्शन, गणेशगल्ली इत्यादी प्रसिद्ध मंडळांच्या महाकाय मूर्ती ...

September 9, 2024 3:33 PM September 9, 2024 3:33 PM

views 22

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी घेतले गणरायाचे दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशीष शेलार, भाजपा नेते रावसाहेब दानवे आणि इतर यावेळी उपस्थित होते. त्यानंतर शहा यांनी मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. तसंच वांद्रे पश्चिम इथल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचं दर्शन घेऊन पूजा केली. गृहमंत्री...

September 9, 2024 1:37 PM September 9, 2024 1:37 PM

views 8

गणेशोत्सवाचा उत्साह देशाच्या कानाकोपऱ्यात

देशात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह बघायला मिळत आहे. महाराष्ट्राबाहेरही गणेशोत्सव उत्साहाने साजरा होतो. उत्तर प्रदेशातल्या कानपूर इथं महाराष्ट्र मंडळाकडून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. शंभर वर्षांची परंपरा असलेलं हे मंडळ मराठी पद्धतीनं गणपतीची पूजा अर्चना करतं. कानपूरमधले अनेक मराठी कुटुंबं या उत्सवात भक्ती भावानं सहभागी होतात. १९१९ साली महाराष्ट्र मंडळानं गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली होती.  पुण्यातून सुरू झालेला सार्वजनिक गणेशोत्सव आता आंतरराष्ट्रीय झाला आहे. विविध देशात गणेशोत्सव कशा रीती...

September 8, 2024 11:36 AM September 8, 2024 11:36 AM

views 15

महाराष्ट्रासह देश-परदेशात गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या आनंद सोहळ्याला सुरुवात

महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात आणि जगभरातील अनेक देशातही कालपासून गणेशोत्सवाच्या चैतन्यपर्वाचा प्रारंभ झाला. 64 कलांचा अधिपती, बुद्धिदात्या गणेशाचं काल सर्वत्र वाजत गाजत आगमन झालं. पुण्याच्या वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सवाला ढोल ताशांच्या गजरात, उत्साहात सुरुवात झाली. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती या पाच मानाच्या गणपतींची पारंपरिक पद्धतीनं विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मुंबई आणि उपनगरातही ढोलताशांच्या गजरात विविध मंडळांच्या गणप...

September 7, 2024 8:07 PM September 7, 2024 8:07 PM

views 15

सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह

आज भाद्रपद शुक्ल चतुर्थी. ११ दिवसांच्या गणेशोत्सवाला आज सर्वत्र मोठ्या उत्साहात प्ररंभ झाला. राज्यात ढोलताशांच्या गजरात गणरायाचं घरोघरी आणि सार्वजनिक मंडपांमध्ये आगमन झालं. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असलेला हा उत्सव अनुभवण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक मुंबई - पुण्यात आले आहेत. या उत्सव काळात राज्यात सुमारे ११ हजार कोटी रुपयांहून अधिक व्यापार होण्याची शक्यता व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे. पूजा साहित्य, वस्त्रालंकार, तसंच मिठाईच्या दुकानांमध्ये मोठी उलाढाल पाहायला मिळते.    राष्ट्रपती द्रौपदी ...