January 11, 2026 7:09 PM January 11, 2026 7:09 PM

views 37

ज्येष्ठ समाजवादी नेते माजी आमदार गंगाधर पटणे यांचं निधन

जनता दलाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ समाजवादी नेते गंगाधर पटणे यांचं आज नांदेड इथे वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. पटणे १९९८ ते २००४ या कालावधीत विधानपरिषदेचे माजी सदस्य होते. १९७४ ते १९८१ या काळात ते बिलोली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष होते.  साने गुरुजी आणि  महात्मा बसवेश्वर यांच्यावर निष्ठा असलेले, ग्रंथालय चळवळीचा आधारस्तंभ, शिक्षणप्रेमी नेते अशी त्यांची ओळख होती. पटणे यांनी देहदानाचा संकल्प केला होता.  त्यांचं पार्थिव श्री गुरुगोविंद सिंघजी वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आलं ...