September 13, 2024 3:17 PM September 13, 2024 3:17 PM

views 18

गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेले मुंबईकर परतीच्या वाटेला

गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेले मुंबईकर आता परतीच्या वाटेला लागले आहेत. त्यामुळे माणगाव, इंदापूरसह मुंबई-गोवा महामार्गावरच्या अनेक शहरांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे,असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पाच दिवसांच्या गौरी-गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर चाकरमानी कामावर रुजू होण्यासाठी मुंबईला परतत आहेत. त्यामुळे अनेक शहरात पुन्हा एकदा मोठी वाहतूक कोंडी पहायला मिळत आहे.

September 10, 2024 3:15 PM September 10, 2024 3:15 PM

views 10

सांगली जिल्ह्यातल्या ७९ गावात ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवली

राज्यात ठिकठिकाणी गणेशोत्सव उत्साहाने साजरा होत आहे. सांगली जिल्ह्यातल्या ७९ गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्यात आली असून या गावांचा विशेष प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरव करण्यात येईल. कोकणात गणेशोत्सवाचं भजन संस्कृतीशी अतूट नातं आहे. ही बाब लक्षात घेऊन गेल्यावर्षीपासून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने भजन साहित्याचं वाटप करण्यात येत आहे. यंदाही अनेक भजनी मंडळांना भजन साहित्याचं वाटप झालं.   तर, ठाणे जिल्ह्यात शासकीय योजनांच्या प्रसिद्धीसाठी विहंग गार्डन गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळ...

September 7, 2024 6:41 PM September 7, 2024 6:41 PM

views 16

गणेशचतुर्थीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांच्या देशवासीयांना शुभेच्छा

गणेशचतुर्थीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण देशातल्या अनेक भागात एकत्रित येऊन साजरा केला जातो आणि हे  सामाजिक ऊर्जेचे एक चांगले उदाहरण आहे. असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे की, गणेशोत्सवाचा हा सण  बुद्धी, समृद्धी आणि उज्वल भविष्य देणारा आहे. आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गणपती बाप्पा मोरया म्हणत देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत....