August 23, 2025 3:35 PM

views 8

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी साडेतीनशे एसटी बस आणि एका रेल्वेगाडीची मोफत सुविधा

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मुंबई भाजपने साडेतीनशे एसटी बस आणि एका रेल्वेगाडीची मोफत सुविधा जाहीर केली  असून आजपासून त्या सेवेचा प्रारंभ झाला. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज बांद्रा कुर्ला संकुलातून पहिल्या एसटी बसला भगवा झेंडा दाखवून रवाना केलं. येत्या काळात मुंबईच्या विविध भागांमधून या बसेस सोडल्या जातील तसंच २५ ऑगस्ट रोजी एक विशेष रेल्वेगाडीदेखील कोकणात रवाना होणार असल्याचं शेलार यांनी यावेळी सांगितलं.

July 20, 2025 6:50 PM

views 15

राज्य महोत्सव म्हणून यंदाचा गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होणार – मंत्री आशिष शेलार

राज्य महोत्सव म्हणून यंदाचा गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जाईल, असं राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. पेणमध्ये हमरापूर, जोहे, कळवे या गावातील मुर्तीकारांच्या विविध संघटनांच्या वतीनं आज शेलार यांचा तांबडशेत इथं सत्कार केला गेला त्यावेळी ते बोलत होते. पीओपीच्या मूर्तींवरच्या बंदीबाबत ठरवून षडयंत्र केलं गेलं, यामागे महाविकास आघाडीचा हात होता, मात्र भाजपानं याविरोधात मुर्तिकारांच्या सोबतीनं न्यायालयासह विविध पातळ्यांवर लढा दिला असं ते म्हणाले.