September 8, 2024 7:06 PM

views 20

दीड दिवसाच्या गणपतींचं आज विसर्जन

गणेशोत्सवाचा आजचा दुसरा दिवस असून उत्सवाचा उत्साह सर्वत्र दिसत आहे. मुंबई पुण्यासह राज्यातल्या प्रमुख शहरांमधे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या भव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्तींचं दर्शन घेण्यासाठी तसंच सामाजिक संदेश देणारे नेत्रदीपक देखावे पाहण्यासाठी गर्दी होत आहे. मुंबईत प्रसिद्ध लालबागचा राजासह इतर मंडळांचे गणपती बघण्याकरता भाविकांच्या रांगा लागत आहेत. विविध क्षेत्रातले मान्यवर सेलिब्रिटी, तसंच राजकीय नेतेमंडळी विविध मंडळांच्या गणपतींच्या दर्शनासाठी हजेरी लावत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शह...

September 7, 2024 6:41 PM

views 31

गणेशचतुर्थीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांच्या देशवासीयांना शुभेच्छा

गणेशचतुर्थीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण देशातल्या अनेक भागात एकत्रित येऊन साजरा केला जातो आणि हे  सामाजिक ऊर्जेचे एक चांगले उदाहरण आहे. असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे की, गणेशोत्सवाचा हा सण  बुद्धी, समृद्धी आणि उज्वल भविष्य देणारा आहे. आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गणपती बाप्पा मोरया म्हणत देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत....