August 23, 2025 8:15 PM August 23, 2025 8:15 PM

views 11

गणेशोत्सवात मेट्रो प्रवाशांसाठी खुशखबर !

यंदाच्या गणेशोत्सवात मेट्रो सेवा मध्यरात्रीपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा एमएमआरडीएने केली आहे. येत्या २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान  अंधेरी पश्चिम  आणि गुंदवली या मार्गिकांवरील मेट्रो गाड्या मध्यरात्रीपर्यंत धावणार आहेत. या दोन्ही  स्थानकांवरून शेवटची गाडी ११  ऐवजी मध्यरात्री १२ वाजता धावेल. या काळात आठवड्यातील कामकाजाच्या दिवशी गर्दीच्या वेळेत गाड्यांची वारंवारता अधिक असेल, तर रविवारी दर १० मिनिटांनी गाडी उपलब्ध असेल. 

August 23, 2025 7:12 PM August 23, 2025 7:12 PM

views 11

गणेशोत्सवात राज्य उत्सवानिमित्त गीत आणि पोर्टलचं लोकार्पण

महाराष्ट्रातल्या  घरगुती, सार्वजनिक, गणेशोत्सवाला राज्याचा राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या निमित्त राज्य उत्सवगीताचं आणि ganeshotsav.pldmka.co.in यापोर्टलचं राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते मुंबईतल्या वांद्रे इथं लोकार्पण करण्यात आलं. राज्यातल्या  सुमारे १८०० भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रूपये प्रमाणे भांडवली अनुदान वितरित करण्यात येणार असल्याचंही शेलार यांनी सांगितलं.  यासाठी २३ ऑगस्ट पासून  ६ सप्टेंबर पर्यंत mahaanudan.org या संकेतस्थळावर ऑनलाईन नो...