April 23, 2025 6:24 PM April 23, 2025 6:24 PM
10
देशाचा वारसा आणि ऐतिहासिक स्मारकांचं जतन करण्यासाठी प्रयत्न सुरू – सांस्कृतिक मंत्री
देशाचा वारसा आणि ऐतिहासिक स्मारकांचं जतन करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग सातत्यपूर्ण प्रयत्न करतो आहे असं केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली पुरातत्त्व विभागाच्या केंद्रीय सल्लागार मंडळाची ३८ वी बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांनी बातमीदारांशी संवाद साधला. आज झालेल्या बैठकीला विविध भागधारक उपस्थितीत होती. यापूर्वी साध्य केलेलं यश आणि भविष्यातील योजनांची आखणी यावर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. या बैठकीतल...