December 8, 2025 9:36 AM December 8, 2025 9:36 AM

views 14

आजपासून नवी दिल्लीत युनेस्कोच्या आंतरसरकारी समितीचे २० वे अधिवेशन

  भारताचे 'विकास भी, विरासत भी' हे ब्रीदवाक्य म्हणजे आधुनिकीकरण आणि शहरीकरण करतानाच देशाची सांस्कृतिक वारसा जपण्याची वचनबद्धता आहे अशी खात्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केली. संयुक्त राष्ट्रांच्या वारसास्थळांच्या संवर्धनासाठी असलेल्या आंतरसरकारी समितीच्या 20 व्या सत्राच्या उद्घाटन समारंभाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी हा संदेश दिला आहे.    नवी दिल्ली इथं आजपासून सहा दिवसांच्या सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. परंपरा जपताना कोणताही समुदाय अथवा कोणाचीही श्रध्दा लोप पावणार ...

November 30, 2024 11:42 AM November 30, 2024 11:42 AM

views 7

प्रयागराज मध्ये होणारा महाकुंभ मेळा हे वैश्विक एकतेचं प्रतिक असल्याचं मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचं प्रतिपादन

प्रयागराज मध्ये होणारा महाकुंभ मेळा हे वैश्विक एकतेचं प्रतिक असल्याचं पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी म्हटलं आहे. काल महाकुंभ मेळ्याच्या पूर्वावलोकन कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. महाकुंभ म्हणजे संस्कृती, कला आणि हस्तकलेच्या जागतिक देवाणघेवाणीची संधी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मेळ्यात उत्तम निवास आणि वाहतूक व्यवस्था देण्यासाठी सरकार बांधील असल्याचंही ते म्हणाले. कार्यक्रमात उपस्थित परदेशी प्रतिनिधींनी आपल्या जवळच्या व्यक्तींना महाकुंभ साठी आमंत्रित करण्य...

October 20, 2024 8:50 AM October 20, 2024 8:50 AM

views 8

कॉर्पोरेट जगात पाऊल ठेवताना स्वतःला सिद्ध करा – मंत्री गजेंद्रसिंह शेखावत

कॉर्पोरेट जगात पाऊल ठेवताना स्वतःला सिद्ध करा आणि आपल्या गुणांच्या आधारे कुटुंब तसंच संस्थेची प्रतिष्ठा वाढविण्याचं कार्य करा असं आवाहन केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी काल पुण्यात विद्यार्थ्यांना केलं. एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या दीक्षांत सोहोळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विज्ञान क्षेत्रात आयुष्यभर केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉक्टर कृष्णस्वामी विजय राघवन यांना "एमआयटी विज्ञान महर्षी सन्मान” देऊन याप्रसंगी गौरविण्यात आलं. ...

September 3, 2024 9:56 AM September 3, 2024 9:56 AM

views 8

पर्यटन क्षेत्रात अधिक विकासासाठी खाजगी गुंतवणूक वाढवणं आवश्यक – केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत

देशात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असून,या क्षेत्रात अधिक विकासासाठी खाजगी गुंतवणूक वाढवणं आवश्यक आहे, अस मत केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी व्यक्त केल. मेघालयात शिलॅांग इथ पर्यटनमंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. देशात पर्यटन विकासाला चालना मिळावी आणि सर्व राज्यांमध्ये समन्वय राहावा यासाठी केंद्रसरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या वतीने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीची साखळी आयोजित करण्यात येत आहे . त्यातील...