September 15, 2024 3:41 PM September 15, 2024 3:41 PM

views 16

गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींच्या कळपाकडून पिकांची नासधूस

गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींच्या कळपाने पिकांची नासधूस केल्याने भातशेतीचं नुकसान झालं आहे. या कळपात २८ रानटी हत्ती असून ते कुरखेडा, आरमोरी, शंकरनगर, पाथरगोटा या भागात त्यांनी नुकसान केलं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे करून भरपाई देण्यात येईल, असं वनविभागाने म्हटलं आहे. हे हत्ती सध्या वैरागड परिसरात चुनबोडीच्या जंगलात गेले असून ते पुढे पोर्ला परिसरात जाऊ शकतात, असा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे.

September 9, 2024 7:06 PM September 9, 2024 7:06 PM

views 19

गडचिरोली आणि चंद्रपूरला आज रेड अलर्ट

गेल्या चोवीस तासात, विदर्भात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर विदर्भात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकण, आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.    हवामान विभागानं मुसळधार पावसामुळं गडचिरोली आणि चंद्रपूरला आज रेड अलर्ट दिला आहे. ...

September 9, 2024 7:04 PM September 9, 2024 7:04 PM

views 20

मुसळधार पावसानं गडचिरोलीत पर्लकोटा नदीला पूर

दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं गडचिरोलीत पर्लकोटा नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी भामरागड गावात शिरल्यानं तिथल्या १०१ नागरिकांना निवारागृहात हलवलं आहे. धुळेपल्ली गावाजवळील पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी वाचवलं. पुरामुळे भामरागड-आलापल्ली, आष्टी-मुलचेरा आणि आलापल्ली-सिरोंचा हे तीन प्रमुख मार्ग बंद आहेत.

September 9, 2024 6:34 PM September 9, 2024 6:34 PM

views 20

गडचिरोलीमधल्या हजारो अंगणवाडी सेविका, मदतनिसांनी केले जेलभरो आंदोलन

मानधनवाढ, पेंशन आणि अन्य मागण्या प्रशासनानं मान्य न केल्यानं गडचिरोलीमधल्या हजारो अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी आज मोर्चा काढत जेलभरो आंदोलन केले. ‘सिटू’ संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. या आंदोलनात हिवताप प्रतिबंधक फवारणी कामगारही सहभागी झाले होते.

August 30, 2024 8:13 PM August 30, 2024 8:13 PM

views 12

सहा लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याचं गडचिरोली पोलिसांपुढं आत्मसमर्पण

गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या पश्चिम उपक्षेत्र विभाग तांत्रिक समितीचा सदस्य केदार उर्फ मन्या किंजो नैताम यानं आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. शासनाने त्याच्यावर ६ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. २०१२ ते २०२० पर्यंत तो प्लाटून क्रमांक १५ मध्ये कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे १८, जाळपोळीचे ३, खुनाचे ८ आणि अन्य ६ अशा एकूण ३४ गुन्ह्यांची नोंद आहे. आत्मसमर्पण योजना सुरु झाल्यापासून गडचिरोलीत ६७३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे.

July 18, 2024 7:08 PM July 18, 2024 7:08 PM

views 12

गडचिरोलीत चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाल्यानं नक्षलवाद्यांच्या दोन दलमचा बीमोड

गडचिरोली जिल्ह्यात छत्तीसगडच्या सीमेलगतच्या जंगलात काल पोलिसांबरोबरच्या चकमकीत दोन दलमचा बीमोड झाल्याचं पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले होते. त्यांच्यावर एकूण ३० लाख रुपयांचं बक्षीस होतं. या कारवाईमुळे उत्तर गडचिरोलीत सक्रिय असलेल्या ‘टिपागड एलओएस’ आणि ‘चातगाव-कसनसूर’ या नक्षल्यांच्या दोन दलमचा बीमोड झाला. या चकमकीत जखमी झालेल्या पोलिसांवर नागपूरच्या रुग्णालय़ात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांनी सांगितलं.

July 18, 2024 5:33 PM July 18, 2024 5:33 PM

views 9

गडचिरोलीत पोलिसांबरोबरच्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार

गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातल्या जारावंडी क्षेत्रांतर्गत छत्तीसगड सीमेलगतच्या वांडोली नजीकच्या जंगल परिसरात काल झालेल्या चकमकीत १२ नक्षली ठार झाले. त्यात ७ पुरुष आणि २ महिलांचा समावेश असून, सर्वांची ओळख पटली आहे.   या १२ जणांवर मिळून ३० लाख रुपयांचं बक्षीस होतं. या कारवाईमुळे उत्तर गडचिरोलीत सक्रिय टिपागड एलओएस आणि चातगाव-कसनसूर या नक्षल्यांच्या दोन दलमचा बीमोड झाल्याचं पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं.या चकमकीत जखमी झालेल्या पोलिसांवर नागपूरच्या रुग्णालय़ात ...

July 17, 2024 3:26 PM July 17, 2024 3:26 PM

views 16

गडचिरोली जिल्हा भविष्यात राज्यातला अग्रेसर जिल्हा असेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली जिल्हा हा भविष्यात राज्यातला सर्वात अग्रेसर जिल्हा असेल असा विश्वास, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या प्रकल्पाचं भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते गडचिरोली इथं झालं त्यावेळी ते बोलत होते. अहेरी तालुक्यात वडलापेठ इथं साडेतीनशे एकर जागेवर १० हजार कोटी रुपयांचा हा पोलाद प्रकल्प उभा राहाणार आहे.

July 7, 2024 3:09 PM July 7, 2024 3:09 PM

views 9

गडचिरोली जिल्ह्यात संपूर्णता अभियानाला शुभारंभ

गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड या आकांक्षित तालुक्यात काल संपूर्णता अभियानाला सुरुवात झाली. अभियानाबाबत जनजागृती करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी रॅली काढली. तसंच महिला आणि बालकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोषण आहाराचे स्टॉल लावून त्यासंबंधी माहिती दिली.

June 27, 2024 9:29 AM June 27, 2024 9:29 AM

views 8

गडचिरोलीत कवसेर प्रकल्पामुळे कुपोषित श्रेणीतल्या १७७ बालकांच्या प्रकृतीत सुधारणा

गडचिरोली जिल्हा परिषदेच्या कवसेर प्रकल्पामुळे गेल्या महिन्याभरात तीव्र कुपोषित श्रेणीतल्या १७७ बालकांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. या प्रकल्पाअंतर्गत ६१५ तीव्र कुपोषित बालकांना ग्राम बालविकास केंद्र, पोषण पुनर्वसन केंद्र आणि बाल उपचार केंद्रांमध्ये दाखल करुन त्यांना सकस आहार पुरवण्यात आला. ३० दिवसांनंतर यातील १७७ बालकांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा दिसून आली.