December 16, 2024 10:31 AM December 16, 2024 10:31 AM

views 8

गडचिरोलीत पोलिसांनी शोधली नक्षल्यांनी जंगलात पुरुन ठेवलेली स्फोटकं

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने जंगलात पुरुन ठेवलेली स्फोटकं शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं. अहेरी तालुक्यातील मरपल्ली पोलिस मदत केंद्रांतर्गत, करंचा गावानजीकच्या जंगलातून ही स्फोटकं शिताफीने बाहेर काढून ती नष्ट करण्यात आली. जिमलगट्टाचे उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत दसूरकर यांच्या नेतृत्वात मरपल्ली पोलिस मदत केंद्रातील पोलिस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी ही शोध मोहीम राबवली.   [video width="720" height="1280" mp4="https://www.newsonair.gov.in/wp-co...

December 2, 2024 8:02 PM December 2, 2024 8:02 PM

views 9

भामरागड दलमची सदस्य असलेल्या नक्षल महिलेचं पोलीस आणि केंद्रीय राखीव दलासमोर आत्मसमर्पण

गडचिरोली जिल्ह्यात आज भामरागड दलमची सदस्य असलेल्या एका  नक्षल महिलेनं पोलिस आणि केंद्रीय राखीव दलासमोर आत्मसमर्पण केलं. ८ चकमकी, ३ खून आणि एका दरोड्याच्या गुन्ह्यात तिचा सहभाग होता. राज्य शासनानं  तिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.   गडचिरोली जिल्ह्यात आजपासून सुरु झालेल्या नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहात पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे दिवसभरात कोणतीही अनुचित घटना घडली नाही, अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. 

November 27, 2024 7:45 PM November 27, 2024 7:45 PM

views 35

बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक ठराव मंजूर

बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायतींनी बालविवाह प्रतिबंधक ठराव मंजूर केले. गावकऱ्यांनी बालविवाह होणार नाही अशी सामुहिक प्रतिज्ञा ग्रामसभांमध्ये घेतली. या ग्रामसभांमध्ये शाळांचे मुख्याध्यापक, आशा स्वयंसेवक, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलिस पाटील, गावातील राजकीय, सामाजिक पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.   गडचिरोली जिल्हा प्रशासन, जिल्हा महिला आणि बाल विकास विभाग तसंच ‘स्पर्श’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत गडचिरोली श...

November 17, 2024 3:42 PM November 17, 2024 3:42 PM

views 10

काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांची गडचिरोली इथं प्रचारसभा

महायुतीच्या काळात महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजरातमध्ये नेण्यात आले, यामुळे राज्यातली दहा लाख कोटींची गुंतवणूक बाहेर गेली, आठ लाख नोकऱ्या गेल्या, आणि ६ हजारपेक्षा जास्त कंपन्या बंद पडल्या, असा आरोप काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी केला. त्या आज गडचिरोली इथं प्रचारसभेत बोलत होत्या. स्वातंत्र्यानंतर देशभरात मोठमोठे उद्योग, संस्था, निर्माण झाल्या. कोणत्याही सरकारने जनतेसोबत भेदभाव केला नाही. मात्र महायुती आणि भाजपाचं सरकार जनतेसोबत भेदभाव करतं, अशी टीका गांधी यांनी केली. प्रधानमंत्री नर...

November 9, 2024 7:37 PM November 9, 2024 7:37 PM

views 14

बीड विधानसभा मतदारसंघात गृह मतदानाला आज सकाळपासून सुरुवात

बीड विधानसभा मतदारसंघात गृह मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली. हे गृह मतदान उद्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या आरमोरी विधानसभा क्षेत्रातील देसाईगंज येथील १०१ वर्षीय श्रीमती ताराबाई शेंडे यांनी गृहमतदान सुविधेचा लाभ घेत आज आपला मतदानाचा हक्क बजावला.

November 3, 2024 4:12 PM November 3, 2024 4:12 PM

views 25

आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिराम वरखडे यांचं निधन

गडचिरोली जि्ल्ह्यातल्या आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिराम वरखडे यांचं काल रात्री नागपुरात एका खासगी रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. आज दुपारी आरमोरी तालुक्यातल्या जोगीसाखरा या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.   हरिराम वरखडे हे १९९० च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर आरमोरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पुढे १९९२ मध्ये त्यांनी छगन भुजबळ यांच्या समवेत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर ते राष्ट्रव...

October 22, 2024 7:13 PM October 22, 2024 7:13 PM

views 3

गडचिरोलीत पोलीस चकमकीत ठार झालेल्यांमध्ये २ मोठ्या नक्षली म्होरक्यांचा समावेश

गडचिरोली जिल्ह्यात काल झालेल्या चकमकीत ठार झालेल्यांमध्ये नक्षलवाद्यांच्या २ मोठ्या म्होरक्यांचा समावेश आहे. दोघांवरही प्रत्येकी १६ लाख रुपयांचं बक्षीस होतं. या सर्वांची ओळख पटल्यानंतर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आज ही माहिती दिली. जया उर्फ भुरी पदा आणि सावजी उर्फ अंकलू तुलावी हे दोघे कालच्या चकमकीत मारले गेले. हे दोघेही विभागीय समितीचे सदस्य होते. या दोघांशिवाय आणखी तिघे या चकमकीत मारले गेले, त्यांच्यावर प्रत्येकी २ लाख रुपयांचं बक्षीस होतं.

October 22, 2024 9:03 AM October 22, 2024 9:03 AM

views 5

गडचिरोलीमध्ये पोलिसांबरोबरच्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार

गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले. या चकमकीत एक पोलीस जखमी झाला असून, त्याच्यावर गडचिरोली इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान घातपाताचा कट रचण्यासाठी कोपर्शीच्या जंगलात नक्षलवादी एकत्र आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या भागात सी-६० पथकाच्या २२ तर केंद्रीय राखीव दलाच्या दोन तुकड्यांनी नक्षलविरोधी अभियान राबवलं. यादरम्यान झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी मारले गेले, त्यांची ओळख पटवणं सुरू आहे. .

October 19, 2024 7:45 PM October 19, 2024 7:45 PM

views 7

नक्षलवादी चळवळीत सक्रीय एका दाम्पत्यानं पोलिसांपुढे आत्मसमर्पण

नक्षलवादी चळवळीत सक्रीय असणाऱ्या एका दाम्पत्यानं आज गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. असिन राजाराम कुमार आणि अंजू सुळ्या जाळे अशी या दोघांची नावं आहेत. असिन हा ओदिशातील नक्षल चळवळीच्या प्रेस टीममध्ये एरिया कमिटी मेंबर म्हणून काम करायचा तर अंजू ही याच दलममध्ये सदस्य होती. २०२२ पासून आतापर्यंत २९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे.

October 14, 2024 7:02 PM October 14, 2024 7:02 PM

views 4

नक्षल दाम्पत्याचं केंद्रीय राखीव दल आणि गडचिरोली जिल्हा पोलिसांपुढे आत्मसमर्पण

अनेक गंभीर गुन्ह्यांत सहभागी असलेल्या नक्षल दाम्पत्यानं आज केंद्रीय राखीव दल आणि गडचिरोली जिल्हा पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. वरुण राजा मुचाकी उर्फ उंगा उर्फ मनिराम उर्फ रेंगू याच्यावर १५ गुन्हे दाखल असून सरकारनं त्याच्यासाठी ८ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. तो छत्तीसगडचा असून तो सध्या भामरागड दलमचा कमांडर म्हणून कार्यरत होता. त्याची पत्नी रोशनी विजया वाच्छामी  हिच्यावरही  २३ गुन्हे दाखल असून सरकारनं  तिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं होतं.