February 5, 2025 7:36 PM February 5, 2025 7:36 PM

views 16

नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या एका 11 वर्षीय मुलीला गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झाल्याचं स्पष्ट

नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या एका 11 वर्षीय मुलीला जीबीएस, अर्थात गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. अक्कलकुवा तालुक्यातली हा मुलगी 25 जानेवारीपासून उपचारासाठी दाखल असून तिच्यात जीबीएसची लक्षणं दिसून येत होती. सध्या ती व्हॅटीलेटरवर असून तिची प्रकृती स्थिर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

February 5, 2025 7:32 PM February 5, 2025 7:32 PM

views 16

देशातल्या ६ जिल्ह्यांपैकी गडचिरोली हा जिल्हा मलेरियामुळे सर्वाधिक प्रभावित

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार गडचिरोली हा मलेरियामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या, देशातल्या ६ जिल्ह्यांपैकी एक आहे. या जिल्ह्याला मलेरियामुक्त करण्यासाठी डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखालील कृतीदलानं सादर केलेल्या जिल्हा मलेरियामुक्त करण्याच्या आराखड्याची येत्या १ एप्रिलपासून अंमलबजावणी सुरू होणार आहे. यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत २५ कोटी रुपयांची तरतूदही उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

February 2, 2025 12:07 PM February 2, 2025 12:07 PM

views 8

गडचिरोली जिल्ह्यातले पंचायत समितीचे माजी सभापती यांची हत्या

गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम मडावी यांची काल नक्षलवाद्यांनी गळा दाबून हत्या केल्याचं वृत्त आहे. मडावी हे भामरागड तालुक्यातल्या कियर इथले रहिवासी होते. २०१७ ते २०१९ अशी अडीच वर्षे ते भामरागड पंचायत समितीचे सभापती होते. सध्या ते उपसभापती म्हणून कार्यरत होते. घटनास्थळी नक्षलवाद्यांचं एक पत्रक सापडलं असून, त्यात सुखराम मडावी हे पोलिस खबरी होते. त्यांनी ठिकठिकाणी पोलिस मदत केंद्र उघडण्यास आणि लोहखाणीला समर्थन देणारं काम केले, म्हणून त्याची हत्या केल्याचा मजकूर आहे.

January 13, 2025 8:28 PM January 13, 2025 8:28 PM

views 9

आरोग्यविषयक कार्यक्रम अंमलबजावणी निर्देशांकात गडचिरोली राज्यात तिसरा

आरोग्यविषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणी निर्देशांकात गडचिरोली जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती आरोग्य सेवा संचालनालयानं दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यानं गरोदर माता नोंदणी, माता - बाल संगोपन, मुलांचं लसीकरण, हिवताप आणि क्षयरोग निर्मूलन अशा वेवेगवेगळ्या ६४ आरोग्य निर्देशांकांत केलेल्या कामगिरीवरून आरोग्य सेवा आयुक्त कार्यलयानं हे गुणांकन केलं आहे. आरोग्य सेवेत यापुढे देखील अव्वल राहण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग प्रयत्नशील राहणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

January 9, 2025 3:26 PM January 9, 2025 3:26 PM

views 12

मुकेश चंद्राकर यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी गडचिरोलीत पत्रकारांचा मूक मोर्चा

छत्तीसगडमधले पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आज गडचिरोली इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काही पत्रकारांनी मूक मोर्चा काढला होता. चंद्राकर यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी, तसंच पत्रकार संरक्षण समिती स्थापन करावी अशा मागण्या त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आपल्या निवेदनात केल्या आहेत.

January 7, 2025 7:02 PM January 7, 2025 7:02 PM

views 7

गडचिरोली ठाकूरदेव यात्रेत जल, जंगल, जमिनीचे संवर्धन करण्याचा नागरिकांचा संकल्प

गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली तालुक्यात सुरजागड इथल्या ठाकूरदेव यात्रेत आसपासच्या ७० गावातल्या  नागरिकांनी जल, जंगल आणि जमिनीचे संवर्धन करण्याचा संकल्प सोडला. दरवर्षी ५ ते ७ जानेवारी असे तीन दिवस ही यात्रा भरते. यंदाच्या यात्रेतही हजारो आबालवृद्ध सहभागी झाले होते. घटस्थापना झाल्यानंतर ठाकूरदेवाची महापूजा आणि गडचढाई करण्यात आली, तसेच ध्वजारोहणही पार पडलं.  रात्री पारंपरिक रेला नृत्य आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम झाले.

January 2, 2025 3:55 PM January 2, 2025 3:55 PM

views 22

नक्षलग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांची प्रधानमंत्र्यांकडून प्रशंसा

दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. यामुळे या भागातल्या जीवन सुलभतेला चालना मिळेल, आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होईल, असं त्यांनी समाजमाध्यमवरच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. गडचिरोली इथं काल ११ नक्षली अतिरेक्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदी यांनी गडचिरोलीतल्या नागरिकांचं विशेष अभिनंदन केलं आहे.

January 2, 2025 9:55 AM January 2, 2025 9:55 AM

views 14

गडचिरोलीत 11 नक्षली मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शरण

गडचिरोली इथं विमला सिडाम उर्फ तारक्का हिच्यासह 11 नक्षल्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शरणागती पत्करली. तारक्का मागील 38 वर्षांपासून नक्षल चळवळीत होती. संविधानविरोधी आणि देशविरोधी कृत्यामुळे आपला विकास होत नाही हे नक्षल्यांच्या लक्षात आल्यामुळे अनेक जण देशाची व्यवस्था आणि संविधानावर विश्वास ठेवून मुख्य प्रवाहात येत आहेत असं फडणवीस यावेळी म्हणाले. याप्रसंगी उल्लेखनीय कामगिरी करणारे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. फडणवीस यांनी भामरागड तालुक्यातील पेनगुं...

January 1, 2025 8:39 PM January 1, 2025 8:39 PM

views 15

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ताराक्कासह ११ जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

गडचिरोलीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थितीत ११ जहाल नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. यात ८ महिला आणि ३ पुरुष आहेत. त्यांच्यावर राज्यात १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची बक्षिसं असून, छत्तीसगड सरकारनंही त्यांच्यावर बक्षिस जाहीर केलं होतं.    यात दंडकारण्य झोनल कमिटी प्रमुख आणि भूपतीची पत्नी ताराक्का, ३डिव्हिजन किमिटी मेंबर, १ उपकमांडर, तर ३ एरिया कमिटी मेंबर आहेत. या सर्वांना पुढचं जीवन जगण्यासाठी ८६ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली.    उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाल...

December 21, 2024 1:42 PM December 21, 2024 1:42 PM

views 7

दोन जहाल नक्षलवाद्यांचं गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण

वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आणि शासनानं बक्षीस जाहीर केलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांनी काल गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण केलं. रामसू पोयाम आणि रमेश कुंजाम अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावं आहेत. रामसू पोयामावर चकमक, खून, दरोडा आदी संबंधित १२ गुन्हे दाखल असून त्याच्यावर शासनानं सहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. रमेश कुंजाम २०१९ पासून नक्षली कारवायात सहभागी असून त्याच्यावरही शासनानं दोन लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं. आत्मसमर्पण योजना सुरु...