May 20, 2025 3:11 PM May 20, 2025 3:11 PM

views 11

गडचिरोलीत ५ जहाल महिला नक्षलवाद्यांना अटक

अनेक हिंसक कारवायांमधे सहभागी असलेल्या पाच महिला नक्षलवाद्यांना पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी आज गडचिरोली इथून ताब्यात घेतलं. यातल्या तिघींना अटक करण्यात आली असून दोघी अल्पवयीन असल्यानं त्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे.  या नक्षलवाद्यांवर एकूण ३६ लाख रुपयांचं इनाम होतं. उंगी मंगरू होयाम उर्फ सुमली, पल्लवी केसा मिडियम उर्फ बंडी आणि देवे कोसा पोडियाम उर्फ सविता अशी  अटक केलेल्या नक्षलवाद्यांची नावं आहेत.  त्यांच्याकडून तीन एसएलआर रायफल, एक ३०३ रायफल, दोन भरमार बंदुका ज...

May 7, 2025 3:51 PM May 7, 2025 3:51 PM

views 16

गडचिरोलीत खनिकर्मविषयक अभ्यासक्रमासाठी गोंडवाना विद्यापीठाचे परदेशी विद्यापीठांबरोबर करार

खनिजसंपन्न गडचिरोली जिल्ह्यात खनिकर्म विषयाचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहेत. स्वायत्त 'विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था' स्थापन करण्याबाबत गडचिरोलीचं गोंडवन विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियाचं कार्टीन विद्यापीठ यांच्यात आज यासंदर्भातल्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. मुंबईत राजभवन इथं राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार झाला. 

April 27, 2025 3:15 PM April 27, 2025 3:15 PM

views 12

गडचिरोलीतल्या कटेझरी गावात राज्य परिवहन मंडळाची बस धावणार

गडचिरोली जिल्ह्यातल्या कटेझरी गावात काल प्रथमच राज्य परिवहन मंडळाची बस पोहोचली. यावेळी स्थानिक नागरिकांनी ढोलताशांच्या निनादात आनंद व्यक्त केला.  उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांनी बसचं स्वागत केलं तर कटेझरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजय भोसले यांनी बसला हिरवा झेंडा दाखवला.  धानोरा तालुक्यातलं अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल हे गाव असून आजूबाजूच्या १० ते १२ गावातल्या नागरिकांना या बससेवेचा लाभ मिळणार आहे. 

April 13, 2025 6:48 PM April 13, 2025 6:48 PM

views 17

गडचिरोलीत आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांसाठी विपश्यना शिबराचं आयोजन

आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांसाठी पोलिस दलानं आज विपश्यना शिबराचं आयोजन केलं आहे. या शिबिरात हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केलेल्या १०२ जणांनी सहभागी होऊन ध्यानसाधनेद्वारे जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे धडे गिरवले. नक्षल्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडावेत यासाठी गडचिरोलीतल्या पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात विपश्यना शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. 

March 23, 2025 7:52 PM March 23, 2025 7:52 PM

views 19

गडचिरोली जिल्ह्यातल्या अतिदुर्गम गावांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस फेऱ्या सुरू

गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यातील मुरूमगाव, पेंढरी आणि रांगी या शेवटच्या टोकाच्या तीन अतिदुर्गम गावांसाठी राज्य परिवहन महामंडळानं बस फेऱ्या सुरू केल्या आहेत. यामुळे या गावातील आदिवासी बांधवांची मोठी सोय झाली आहे. या नागरिकांनी बस सुरू करण्याच्या मागणीचं निवेदन राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  दिलं होतं. त्यावर फडणवीस यांनी तत्काळ कार्यवाही केली.

March 23, 2025 9:48 AM March 23, 2025 9:48 AM

views 15

गडचिरोलीत अवकाळी पावसामुळे पीकांचं नुकसान

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मिरची आणि कापूस पिकांना मोठा फटका बसला आहे. शासनानं तत्काळ पंचनामे करुन भरपाई द्यावी, अशी मागणी मिरची आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्ह्याच्या अहेरी आणि चामोर्शी तालुक्यातील काही भागातही शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला असून, यंदा मोहफुलांच्या उत्पादनावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

March 23, 2025 9:24 AM March 23, 2025 9:24 AM

views 17

गडचिरोलीत वाघांच्या हल्ल्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात झालेल्या जिवीतहानीची गंभीर दखल घेतली आहे. गडचिरोलीत वाघांचे हल्ले रोखण्यासाठी 3 महिन्यात आराखडा तयार करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत. यामध्ये, गेल्या पाच वर्षात वाघांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या नगिरकांच्या कुटुंबियांना विशेष नुकसान भरपाई, अतिरिक्त वाघांचं स्थलांतर आदींचा समावेश आहे.

February 13, 2025 3:21 PM February 13, 2025 3:21 PM

views 7

गडचिरोलीत नक्षलविरोधी अभियानावर जाताना शिपायाचा मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यातल्या एका पोलीस शिपायाचा नक्षलविरोधी अभियानावर जाताना हृदयविकाराच्या झटक्यानं काल मृत्यू झाला. रवीश मधुमटके हे काल संध्याकाळी भामरागड तालुक्यातल्या नक्षलवादी मोहीमेवर निघाले होते. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी त्यांना मृृत घोषित केलं. ते २०१२ साली पोलीस दलात भरती झाले होते.

February 11, 2025 8:25 PM February 11, 2025 8:25 PM

views 6

गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद

गडचिरोली जिल्ह्यात आज नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला. भामरागड तालुक्यातल्या दिरंगी आणि फुलणार गावांच्या जंगलात नक्षलवाद्यांनी छावणी उभारल्याची माहिती मिळाल्यानंतर सी-६० पथकाच्या १८ आणि जलद प्रतिसाद पथकाच्या २ तुकड्यांनी काल त्या भागात नक्षलविरोधी अभियान सुरु केलं होतं. या अभियानादरम्यान पोलिसांनी नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला असून, नक्षल साहित्य ताब्यात घेतलं आहे. 

February 7, 2025 7:24 PM February 7, 2025 7:24 PM

views 9

देशातली सर्वात मोठी औद्योगिक परिसंस्था विदर्भात तयार होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं प्रतिपादन

देशातली सर्वात मोठी औद्योगिक परिसंस्था विदर्भात, गडचिरोलीला केंद्रस्थानी ठेवून तयार होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री फडनवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नागपूरमध्ये ‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ २०२५ औद्योगिक महोत्सवाचं’ उदघाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. गडचिरोलीमध्ये होऊ घातलेल्या 'पोलाद क्रांती'चा फायदा या संपूर्ण प्रदेशाला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या ५ वर्षांत गडचिरोली हे देशाचं पोलाद उत्पादन केंद्र म्हणून उदयाला येईल, असा ...