May 12, 2025 2:28 PM May 12, 2025 2:28 PM

views 14

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षली शिबिरं उद्ध्वस्त

गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र आणि छत्तीसगड जिल्ह्याच्या सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमधे आज चकमक झाली. या चकमकीत काही नक्षलवादी ठार आणि जखमी  झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांनी नक्षली शिबिरं उद्ध्वस्त केली असून त्यांच्याकडील बंदुका आणि अन्य साहित्य ताब्यात घेतलं आहे. 

March 5, 2025 8:00 PM March 5, 2025 8:00 PM

views 13

गडचिरोली पोलीस आणि CRPF नं आज दोन नक्षलवाद्यांना अटक

गडचिरोली पोलिस आणि CRPF नं आज दोन नक्षलवाद्यांना अटक केली. केलू पांडू मडकाम आणि रमा दोहे कोरचा अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्यावर ८ लाख रुपयांचं बक्षीस होतं. एका पोलिस शिपाई तसंच भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम मडावी यांच्या हत्येत त्यांचा सहभाग होता.

January 8, 2025 7:31 PM January 8, 2025 7:31 PM

views 17

दोन नक्षलवादी महिलांचं गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण

सुमारे १० लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या दोन नक्षलवादी महिलांनी आज गडचिरोलीत पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. शामला उर्फ लीला झुरु पुडो, आणि काजल उर्फ तिम्मी मंगरु वड्डे अशी त्यांची नावं आहेत.   शामला पुडो ही एटापल्ली तालुक्यातल्या गट्टेपल्ली इथली रहिवासी असून २००२ मध्ये ती चामोर्शी दलममध्ये सहभागी झाली. सध्या ती कंपनी क्रमांक १० ची सेक्शन कमांडर होती. तिच्यावर २१ चकमकी, ६ जाळपोळ, आणि इतर १८, अशा एकूण ४५ गुन्ह्यांची नोंद आहे. शासनानं तिच्यावर ८ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केले होतं.   काजल वड्...