December 20, 2025 3:41 PM December 20, 2025 3:41 PM

views 12

गडचिरोलीतल्या २ नक्षलवाद्यांना अटक

गडचिरोलीतल्या दिनेश गावडे खून प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सीपीआय माओवादी या बंदी असलेल्या संघटनेच्या दोन नक्षलवाद्यांना अटक केली आहे. पोलिसांचा खबरी असल्याच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य असल्याच्या संशयावरून गावडे याचा दोन वर्षांपूर्वी खून झाला होता. या प्रकरणी एनआयएनं आणखी ४ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं होतं. या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे.

December 20, 2025 3:22 PM December 20, 2025 3:22 PM

views 22

गडचिरोलीत अतिदुर्गम भागात नव्या पोलीस ठाण्याचं उद्घाटन

गडचिरोलीमधल्या एटापल्ली तालुक्यातल्या अतिदुर्गम तुमरकोठी इथल्या  नव्या पोलीस ठाण्याचं उद्घाटन अपर पोलिस महासंचालक छेरिंग दोरजे यांच्या हस्ते झालं. गडचिरोली पोलीस दलाच्या सी-६० पथकाचे १ हजार कमांडो, बॉम्ब शोधक  आणि  नाशक पथकाचे २१ चमू, नवनियुक्त पोलिस, ५०० पोलिस अधिकारी आणि खासगी कंत्राटदारांच्या मदतीनं हे नवं पोलिस ठाणं उभं राहिलं आहे. हे पोलिस ठाणे कोठी पोलिस ठाण्यापासून ७ किलोमीटर, तर छत्तीसगड सीमेपासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर आहे.

December 10, 2025 3:31 PM December 10, 2025 3:31 PM

views 14

गडचिरोलीत ११ नक्षली अतिरेक्यांचं आत्मसमर्पण

गडचिरोली इथं आज ११ जहाल नक्षलवाद्यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं. त्यांच्यावर एकंदर ८२ लाख रुपयांचं बक्षीस होतं. विभागीय समितीच्या दोन सदस्यांचाही यात समावेश आहे.   यावेळी रश्मी शुक्ला यांनी जहाल नक्षलवादी भूपती याच्या शरणागतीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सी-६० कमांडोंचा सत्कार केला आणि त्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं. तसंच उर्वरित नक्षवाद्यांनाही शस्त्रं टाकून आत्मसमर्पण करायचं आवाहन केलं.

November 22, 2025 6:04 PM November 22, 2025 6:04 PM

views 22

२०२९ पर्यंत काँग्रेस पक्षाचं अस्तित्व फार शिल्लक राहणार नाही- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये प्रचंड विसंगती असल्यानं हा पक्ष देशातून हद्दपार होत आहे. २०२९ पर्यंत या पक्षाचं अस्तित्व फार शिल्लक राहणार नाही, असं  मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज व्यक्त केलं. गडचिरोली इथं भाजपच्या नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं.त्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते.

November 9, 2025 9:00 AM November 9, 2025 9:00 AM

views 26

गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेत अमूलाग्र परिवर्तन घडून येईल – मुख्यमंत्र्यांचा विश्वास

आरोग्य व्यवस्था भक्कम झाल्यामुळं गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेत अमूलाग्र परिवर्तन घडून येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अहेरी इथल्या महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता २ हजार ४०० आजारांचा समावेश करण्यात आला असून, त्याचा फायदा गोरगरीब नागरिकांना होईल असं त्यंनी सागितलं. कोठी आणि रेगडी इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र, वेंगणूर इथलं उपकेंद्र, जारावंडी आणि ताडगाव इथल्या प्राथम...

November 8, 2025 6:59 PM November 8, 2025 6:59 PM

views 24

गडचिरोलीत विविध विकासकामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

गडचिरोलीचा उल्लेख महाराष्ट्राचं प्रवेशद्वार म्हणून होण्यासाठी शेवटच्या गावापर्यंत विकास पोहोचवण्याकरता राज्यसरकार प्रयत्नशील आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं रुबी हॉस्पीटल, वेलनेस रुग्णालय  आणि महाविद्यालय संकुलाचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अहेरीत महिला आणि बाल रुग्णालयाचंही  लोकार्पण झालं.  महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता २ हजार ४०० आजारांचा समावेश करण्यात आला असून, त्या...

November 8, 2025 3:16 PM November 8, 2025 3:16 PM

views 32

गडचिरोलीला महाराष्ट्राचं प्रवेशद्वार म्हणून होण्यासाठी राज्यसरकार प्रयत्नशील

गडचिरोलीचा उल्लेख महाराष्ट्राचं प्रवेशद्वार म्हणून होण्यासाठी शेवटच्या गावापर्यंत विकास पोहोचवण्याकरता राज्यसरकार प्रयत्नशील आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं रुबी हॉस्पीटल अँड वेलनेस रुग्णालय आणि महाविद्यालय संकुलाचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येकाला गुणवत्तापूर्ण आरोग्याचा अधिकार असून गडचिरोली सारख्या भागात देखील आरोग्यसेवा पोहोचत आहेत, जिल्ह्याचं चित्र बदलत आहे, असं ते म्हणाले.   राज्य सरकारनं ...

September 17, 2025 8:58 PM September 17, 2025 8:58 PM

views 18

गडचिरोलीत २ नक्षली महिला ठार

गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली तालुक्यात मोडस्के जंगलात आज दुपारी झालेल्या चकमकीत पोलिसांनी दोन नक्षली महिलांना ठार केलं. पोलिसांनी घटनास्थळावरुन स्वयंचलित रायफलीसह मोठ्या प्रमाणावर दारुगोळा आणि अन्य साहित्य ताब्यात घेतलं आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरु असल्याची माहिती जिल्हा  पोलीस अधीक्षकांनी दिली.  गडचिरोली पोलिसांनी गेल्या २१ दिवसांत झालेल्या दोन चकमकीत ६ नक्षलवाद्यांना ठार केलं आहे.

August 27, 2025 8:25 PM August 27, 2025 8:25 PM

views 17

गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांशी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार

गडचिरोली जिल्ह्यात भामरागड इथं कोपर्शी गावाजवळ आज पोलिसांशी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले. यात तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. नक्षलवादी काही घातपात करायच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती, त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या भागात मोहीम सुरू केली होती.   आज नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबाराच्या प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चौघेजण ठार झाले. आठ तास ही चकमक चालली. पोलिसांनी घटनास्थळावरून काही शस्त्रं जप्त केली आहेत. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटव...

August 14, 2025 6:55 PM August 14, 2025 6:55 PM

views 19

गडचिरोली पोलीस दलातले ७ अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर

गडचिरोली पोलीस दलातले सात अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर झालं आहे. गडचिरोली पोलीस दलातले सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर महाका, लचमा पेंदाम, प्रकाश कन्नाके, अतुल येगोलपवार आणि हिदायत खान यांना शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. शहीद पोलीस शिपाई सुरेश तेलामी यांना मरणोत्तर हा पुरस्कार दिला जाईल. २०१७ मध्ये भामरागड तालुक्यात नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून पोलिसांवर हल्ला केला होता. यावेळी पोलिसांनी त्यांचा धैर्याने प्रतिकार केला. याशिवाय पोल...