March 28, 2025 12:20 PM March 28, 2025 12:20 PM
4
चीलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएक बोरीक फॉन्ट 1 एप्रिलपासून भारतीय दौऱ्यावर
चीलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएक बोरीक फॉन्ट येत्या 1 एप्रिलपासून पाच दिवसांच्या भारत भेटीवर येणार आहेत. भारत-चीली द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या उद्देशानं ही भेट असेल, त्यांच्यासमवेत उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळ, चीलीचे मंत्रीमंडळ सदस्य, वरिष्ठ अधिकारी, व्यापारी प्रतिनिधी तसंच माध्यम प्रतिनिधींचा गटही भारत भेटीवर येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांची ते भेट घेणार असून आग्रा, मुंबई आणि बेंगलूरू इथंलाही दौरा करतील.