November 24, 2025 1:05 PM November 24, 2025 1:05 PM
25
G20 शिखर परिषदेनंतर प्रधानमंत्री मोदी मायदेशी परतले
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेचा दौरा यशस्वीपणे आटोपून आज मायदेशी परतले. जोहान्सबर्ग जी-20 शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाचं मोदी यांनी कौतुक केलं असून, राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांचे आणि दक्षिण आफ्रिकेच्या सरकारचे आभार मानले आहेत. इथं विविध जागतिक नेत्यांशी झालेल्या बैठका आणि संवाद यशस्वी ठरले असून, त्यामुळं विविध देशांशी भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील, असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या शिखर परिषदेचा काल समारोप झाला. या परिषदेच्या तिसऱ्या सत्रात त्...