September 26, 2024 2:23 PM September 26, 2024 2:23 PM

views 6

न्यूयॉर्कमध्ये जी-२० देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी घेतला भाग

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी काल न्यूयॉर्कमध्ये जी-२० देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेतला. ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. जागतिक प्रशासनात सुधारणा करण्यासाठी आवश्यक तीन प्रमुख क्षेत्रांवर त्यांनी भारताचे विचार मांडले. भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या काळात जागतिक नेत्यांनी विकास वाढीचा आणि हवामानासाठी आर्थिक व्यवस्थेचा विस्तार करण्याचं आवाहन जयशंकर यांनी यावेळी केलं.  

September 14, 2024 1:54 PM September 14, 2024 1:54 PM

views 1

भारत जगातला सर्वात मोठा, अन्नावर आधारित सुरक्षा महाजाल कार्यक्रम राबवत आहे- रामनाथ ठाकूर

अन्न सुरक्षा आणि पोषणाची सुनिश्चिती करण्याच्या दृष्टीनं भारत जगातला सर्वात मोठा, अन्नावर आधारित सुरक्षा महाजाल कार्यक्रम राबवत आहे, असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी स्पष्ट केलं. ते ब्राझीलमध्ये जी - २० कृषीमंत्र्यांच्या बैठकीत बोलत होते.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं शेती विकासाला प्राधान्य दिलं असून निव्वळ उत्पादकतेवर भर देण्याचं भारताचं धोरण नाही तर आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय शाश्वतता, शेतकऱ्यांची भरभराट असा भारताचा सर्वसमावेशक...