May 11, 2025 7:31 PM May 11, 2025 7:31 PM
3
११वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन आणि केंद्रीय पद्धतीने होणार
राज्यात यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन आणि केंद्रीय पद्धतीने होणार आहे. येत्या ११ ऑगस्टपासून महाविद्यालये सुरू होणार असून, १५ ऑगस्टपर्यंत प्रवेशाचे सर्व टप्पे पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक संपत सूर्यवंशी यांनी दिली. प्रवेश प्रक्रियेदरम्यान पालक किंवा विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. राज्य सरकारने mahafyjcadmissions.in हे संकेतस्थळ आणि ८५३०९५५५६४ हा मदत दूरध्वनी क्रमांक दिला आहे.