April 23, 2025 3:05 PM April 23, 2025 3:05 PM
2
एफ.टी.आय.आय, सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था यांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्रदान
केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं पुणे इथली भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था अर्थात एफ.टी.आय.आय. आणि कोलकत्यातल्या सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्रदान केला आहे. या संदर्भातली अधिसूचना शिक्षण मंत्रालयानं काल जारी केली. विद्यापीठ अनुदान आयोगानं केलेल्या शिफारशीनुसार या दोन्ही संस्थांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला गेल्याचं अधिसूचनेत म्हटलं आहे. या निर्णयामुळे या दोन्ही संस्थांना आता विद्यापीठ अनुदान आयोग आणि नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मार्गद...