October 21, 2024 8:06 PM
17
फ्रान्समध्ये शिकण्यासाठी फ्रेंच भाषा येणं आवश्यक नाही – फ्रांसचे मुंबईतले वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शार्ले
फ्रान्समध्ये शिकण्यासाठी फ्रेंच भाषा येणे आवश्यक नाही, फ्रांसमधल्या विद्यापीठांमध्ये किमान १७०० अभ्यासक्रम इंग्रजीतून शिकवले जात आहेत, असं प्रतिपादन फ्रांसचे मुंबईतले वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शार्ले यांनी केलं आहे. जॉन मार्क सेर शार्ले यांनी आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची मुंबईतल्या राजभवन इथं सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. फ्रांस-भारत व्यापार संबंध दृढ होण्यासाठी भारत आणि युरोपिअन महासंघामध्ये मुक्त व्यापार करार होणे आवश्यक आहे, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी सा...