February 8, 2025 2:53 PM February 8, 2025 2:53 PM
6
Freestyle Chess Grand Slam: भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेश सहाव्या स्थानावर
जर्मनीत बाल्टिक कोस्ट इथं वेसेनहाउस इथं सुरू असलेल्या फ्रीस्टाईल ग्रँडस्लॅम झटपट बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरीनंतर भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेश दोन गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. तर फॅबिअनो कॅरुआना साडेचार गुणांची कमाई करत आघाडीवर आहे. दुसऱ्या स्थानावर जाव्होखिर सिंदारोव असून अजून चार फेऱ्या बाकी आहेत. पहिले ८ बुद्धिबळपटू बाद फेरीसाठी पात्र ठरतील.