August 9, 2024 1:32 PM August 9, 2024 1:32 PM

views 11

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या भारत छोडो आंदोलनात भाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली.   हा स्वातंत्रलढ्याच्या चळवळीला  कलाटणी देणारा महत्वपूर्ण दिवस आहे असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.  देश भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण यापासून मुक्त असावा ही भावना या चळवळीच्या माध्यमातून दृढ झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.