July 24, 2025 8:31 PM July 24, 2025 8:31 PM

views 13

भारत- युके मुक्त व्यापार करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या

भारत- युके दरम्यान मुक्त व्यापार करारावर आज स्वाक्षऱ्या झाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्रिटीश प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्याबरोबरची बैठक संपल्यावर संयुक्त निवेदनात ही माहिती दिली. या करारामुळे भारतीय वस्त्रं, पादत्राणं, मौल्यवान रत्नं, मासळी, प्रक्रीया केलेले खाद्यपदार्थ आणि अभियांत्रिकी उपकरणांना युकेमधली बाजारपेठ खुली होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि कराराबद्दल समाधान व्यक्त केलं   युरोपीय संघातून बाहेर पडल्यानंतर युकेच्या दृष्टीनं भारताबरोबरचा मुक्त व्यापार करार हा महत्त्...