September 20, 2025 2:52 PM

views 42

इराणमध्ये रोजगारासंदर्भात जाताना फसवणूक टाळण्याचं परराष्ट्र मंत्रालयाचं नागरिकांना आवाहन

परराष्ट्र मंत्रालयानं भारतीय नागरिकांना इराणमध्ये नोकरीच्या आश्वासनांना किंवा प्रस्तावाला बळी न पडण्याचा सल्ला दिला आहे. अलिकडेच, भारतीय नागरिकांना इराणमध्ये नोकरी देण्याचं किंवा नोकरीसाठी इतर देशांमध्ये पाठवण्याचं आमिष दाखवून फसवण्यात आल्याची प्रकरणं समोर आली आहेत.   इराणमध्ये पोहोचल्यानंतर, या भारतीय नागरिकांचं गुन्हेगारी टोळ्यांकडून अपहरण करुन त्यांच्या सुटकेसाठी त्यांच्या कुटुंबियांकडून खंडणी मागिण्यात आली. इराण सरकार केवळ पर्यटनाच्या उद्देशानं भारतीयांना व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी ...