December 13, 2024 8:28 PM December 13, 2024 8:28 PM

views 11

फ्रान्सचे नवे प्रधानमंत्री म्हणून फ्रान्स्वा बाऊरो यांची नेमणूक

फ्रान्सचे अध्यक्ष एमॅन्यूल मॅक्रॉन यांनी फ्रान्स्वा बाऊरो यांची नवे प्रधानमंत्री म्हणून नेमणूक केली. त्यांच्यासमोर सरकारला स्थिरता देणं आणि अर्थसंकल्प मंजूर करणं हे दोन आव्हानं आहेत. त्या आधीचे प्रधानमंत्री मायकल बार्नियर यांना अविश्वास दर्शक ठरावाद्वारे हटवलं होतं. फ्रान्सच्या इतिहासात सर्वात कमी काळ म्हणजे केवळ ३ महिने ते प्रधानमंत्री पदावर होते.