September 26, 2024 8:42 PM

views 15

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीतल्या भारताच्या स्थायी सदस्यत्वाला फ्रान्सचा पाठिंबा

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत स्थायी सदस्य म्हणून भारताचा समावेश व्हावा यासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी जोरदार पाठिंबा व्यक्त केला आहे. आज सकाळी न्युयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रांच्या आम सभेच्या ७९ व्या अधिवेशनात त्यांनी सांगितलं, की भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझील हे स्थायी सदस्य असले पाहिजेत. त्याबरोबरच आफ्रिकेतल्या दोन देशांनाही प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. सुरक्षा समिती अधिक प्रभावी आणि प्रातिनिधीक करण्यासाठी तिच्या सध्याच्या रचनेत सुधारणा करणं गरजेचं आहे, असं ते म्हणाल...

July 8, 2024 1:04 PM

views 14

फ्रान्सच्या सार्वत्रिक निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर

फ्रान्सच्या सार्वत्रिक निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाले असून यानुसार न्यू पॉप्युलर फ्रंट ही डावी आघाडी १७५ ते २०५ जागांवर विजय मिळवत सर्वात मोठी आघाडी म्हणून उदयाला येत आहे, तर इमॅन्युअल मॅक्राँ यांच्या नेतृत्वाखालची मध्यममार्गी एन्सेम्बल अलायन्स दीडशे ते १७५ जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे. फ्रान्समधली अति उजवी आघाडी - नॅशनल रॅली तिसऱ्या स्थानावर फेकली गेली आहे. ही आघाडी ११५ ते दीडशे जागा जिंकेल. कोणत्याही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं नसून त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे.    मतदानाच्या य...

July 7, 2024 2:15 PM

views 19

फ्रान्समध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान

फ्रान्समध्ये मध्यावधी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज होत आहे. विद्यमान संसदेचा तीन वर्षांचा कार्यकाळ बाकी असतानाच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ९ जून रोजी संसद विसर्जित करून मद्यावधी निवडणुकांची घोषणा केली आहे.   पहिल्या टप्प्यात मरीन ले पेन यांच्या नॅशनल रॅली या उजव्या विचारसरणीच्या पक्षाला ३० टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे आणि नॅशनल रॅली पक्षाने जर स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेल्या २८९ जागा जिंकल्या, तर पक्षाचे नेते जॉर्डन बार्डेला यांची प्रधान...