October 6, 2025 8:13 PM

views 44

अवघ्या ४ आठवड्यात फ्रान्सचे प्रधानमंत्री सॅबास्टियन लेकार्न यांचा राजीनामा

फ्रान्सचे प्रधानमंत्री सॅबास्टियन लेकार्न यांनी पदाचा राजीनामा दिला असून फ्रान्समधे राजकीय अस्थिरता वाढली आहे. लेकार्न यांनी पदभार स्वीकारल्यावर ४ आठवड्यांच्या आतच राजीनामा दिल्याने ते फ्रान्सचे आजवर सर्वात कमी काळ पदावर राहीलेले प्रधानमंत्री बनले आहेत. २०२४मधे झालेल्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने तिथे अस्थिरता वाढली आहे.

September 23, 2025 2:39 PM

views 31

फ्रान्सकडून पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून फ्रान्सची औपचारिक मान्यता असल्याचं आज घोषित केलं. इस्रायली आणि पॅलेस्टिनी नागरिकंदरम्यानच्या शांततेला आपला पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मॅक्रॉन यांनी आज न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या वार्षिक बैठकीच्या उदघाटनपर सत्रात ही माहिती दिली.    ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा आणि पोर्तुगाल यांनी काल स्वतंत्र पॅलेस्टिनी राज्याला औपचारिक मान्यता दिली होती.   दरम्यान, पॅलेस्टाईनला स्वतंत...

March 31, 2025 7:03 PM

views 9

फ्रान्स नॅशनल रॅली पक्षाच्या नेत्या मरीन ले पेन यांना तुरुंगवासाची शिक्षा

युरोपियन महासंघाच्या निधीच्या अपहार प्रकरणात दोषी आढळल्यामुळे फ्रान्सच्या न्यायालयाने नॅशनल रॅली पक्षाच्या नेत्या मरीन ले पेन यांना पाच वर्षांसाठी निवडणूक न लढवण्याची तसंच तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पेन यांनी त्यांच्या पक्षाच्या सदस्यांना पैसे देण्यासाठी युरोपियन संसदेच्या निधीतल्या ३३ लाख डॉलर्सपेक्षाही जास्त रक्कम वापरल्याचा आरोप आहे. पेन यांच्याशिवाय या प्रकरणात आठ जण दोषी आढळले आहेत. त्यामुळे नॅशनल रॅली पक्षाला २० लाख १६ हजार डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

March 7, 2025 2:56 PM

views 22

बॅडमिंटन: आयुष शेट्टी ऑर्लीन्स मास्टर्सच्या क्वार्टरफायनलमध्ये पोहोचला

फ्रान्समध्ये सुरु असलेल्या ऑर्लिअन्स मास्टर्स सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टीनं पुरुषांच्या एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत ४८व्या स्थानावर असणाऱ्या शेट्टीनं उपउपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँगच्या खेळाडूचा २१-२७, २१-२७ असा सरळ गेममध्ये पराभव केला होता. आज संध्याकाळी त्याचा सामना डेन्मार्कच्या बॅडमिंटनपटू सोबत होणार आहे.  दरम्यान भारतीय बॅडमिंटनपटू एच एस प्रणॉय आणि किदंबी श्रीकांत यांना मात्र पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरी आपापल्या प्रतिस्पर्ध्याकडून ह...

February 12, 2025 9:21 AM

views 26

भारत आणि फ्रान्समध्ये व्यवसायाची भूमिका वाढत आहे – मंत्री डॉ. एस. जयशंकर

भारत आणि फ्रान्समधील द्विपक्षीय संबंध परिपक्व होत असताना व्यवसायाची भूमिकाही वाढत आहे, असं मत परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी व्यक्त केलं. ते काल 14 व्या भारत-फ्रान्स मुख्य कार्याध्यक्षांच्या मंचाचं उद्घाटन करताना बोलत होते. भारत आणि फ्रान्स ही स्वतंत्र विचारसरणीची परंपरा असलेली राष्ट्रे असून दोन्ही देशातील सहकार्यामुळे मेक इन इंडिया धोरणालाही लाभ होईल असं डॉ. एस. जयशंकर यांनी यावेळी सांगितलं.

February 10, 2025 1:22 PM

views 13

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्सच्या दौऱ्यावर रवाना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्सच्या दौऱ्यावर रवाना झाले. पॅरिसमधे आयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेचं सह अध्यक्षपद ते भूषवतील. व्यापक जनहिताच्या दृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावर परिषदेत चर्चा होणार असून जगातल्या विविध राष्ट्रांचे नेते आणि तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रमुख त्यात सहभागी होणार आहेत.   याखेरीज फ्रान्स आणि भारताचे धोरणात्मक संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं मॅक्रॉन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी प्रयाणापूर्वी प्रसिद्ध केलेल्या न...

February 7, 2025 8:20 PM

views 21

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारपासून तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या १० तारखेपासून तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते पॅरिसमध्ये होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासमवेत सहभागी होणार आहेत. विदेश सचिव विक्रम मिसरी यांनी आज ही माहिती दिली. त्याचबरोबर प्रधानमंत्री या महिन्याच्या १२ आणि १३ तारखेला अमेरिका दौऱ्यावर जातील. तिथं प्रधानमंत्री अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्वीपक्षीय चर्चा करणार आहेत.

December 17, 2024 9:00 PM

views 21

फ्रान्समध्ये चक्रीवादळामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये २२ जणांचा मृत्यू

फ्रान्समध्ये मेयोत इथे चिडो चक्रीवादळामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत किमान २२ जणांचा मृत्यू झाला तर १ हजार ४०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. हिंदी महासागरातल्या मादागास्कर आणि मोझांबिक बेटांच्या किनाऱ्या दरम्यान मायोत हा द्वीपसमूह आहे. या चक्रीवादळामुळे किती नुकसान झालं आहे, याचा निश्चित आकडा अद्याप कळू शकलेला नाही. सध्या संबंधित भागात बचावकार्य सुरू आहे. या चक्रीवादळाचा फटका मोझांबिकला देखील बसला असून यात आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला आहे.    चिडो चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाबद्...

December 13, 2024 8:28 PM

views 16

फ्रान्सचे नवे प्रधानमंत्री म्हणून फ्रान्स्वा बाऊरो यांची नेमणूक

फ्रान्सचे अध्यक्ष एमॅन्यूल मॅक्रॉन यांनी फ्रान्स्वा बाऊरो यांची नवे प्रधानमंत्री म्हणून नेमणूक केली. त्यांच्यासमोर सरकारला स्थिरता देणं आणि अर्थसंकल्प मंजूर करणं हे दोन आव्हानं आहेत. त्या आधीचे प्रधानमंत्री मायकल बार्नियर यांना अविश्वास दर्शक ठरावाद्वारे हटवलं होतं. फ्रान्सच्या इतिहासात सर्वात कमी काळ म्हणजे केवळ ३ महिने ते प्रधानमंत्री पदावर होते. 

October 21, 2024 8:06 PM

views 17

फ्रान्समध्ये शिकण्यासाठी फ्रेंच भाषा येणं आवश्यक नाही – फ्रांसचे मुंबईतले वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शार्ले

फ्रान्समध्ये शिकण्यासाठी फ्रेंच भाषा येणे आवश्यक नाही,  फ्रांसमधल्या विद्यापीठांमध्ये किमान १७०० अभ्यासक्रम इंग्रजीतून शिकवले जात आहेत, असं  प्रतिपादन फ्रांसचे मुंबईतले वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शार्ले यांनी केलं आहे. जॉन मार्क सेर शार्ले यांनी  आज राज्यपाल सी.  पी.  राधाकृष्णन यांची  मुंबईतल्या  राजभवन इथं  सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.  फ्रांस-भारत व्यापार संबंध दृढ होण्यासाठी भारत आणि  युरोपिअन महासंघामध्ये  मुक्त व्यापार करार होणे आवश्यक आहे, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी सा...