May 25, 2025 7:06 PM May 25, 2025 7:06 PM

views 8

भारतीय शेअर बाजारांमधे परदेशी गुंतवणूकदारांची सुमारे १४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

भारतीय शेअर बाजारांमधे परदेशी गुंतवणूकदारांनी मे २०२५ मधे आतापर्यंत सुमारे १४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अधिकृत आकडेवारी सांगते की, या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी १३ हजार ८३५ रुपये भारतीय समभाग बाजारांमधे गुंतवले मात्र ऋण बाजारातून ७ हजार ७४३ कोटी रुपये काढून घेतले. एप्रिलमधे ४ हजार २२३ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक परदेशातून आली. त्याआधी मार्चमधे ३ हजार ९७३ कोटी रुपये तर फेब्रुवारीमधे ३४ हजार ५७४ कोटी रुपये आणि जानेवारीत ७८ हजार २७ कोटी रुपये परदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतले हो...

December 30, 2024 1:46 PM December 30, 2024 1:46 PM

views 8

डिसेंबरमध्ये भारतीय भांडवली बाजारात २२,००० कोटींहून अधिक रुपयांची परदेशी गुंतवणूक

विदेशी गुंतवणूकदारांनी डिसेंबरमध्ये आतापर्यंत भारतीय भांडवली बाजारात २२,००० कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरीजच्या आकडेवारीनुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात १६ हजार ६७५ कोटी रुपये आणि पत पुरवठा बाजारामध्ये ५ हजार ३५२ कोटी रुपये गुंतवले, त्यामुळं भारतीय भांडवली बाजारात एकंदर निव्वळ गुंतवणूक २२ हजार ०२७ कोटी रुपये झाली. परदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये भांडवली बाजारामधून २१ हजार ६१२ कोटी रुपये आणि ऑक्टोबरमध्ये ९४ हजार १७ कोटी रुपये काढून घेतले होते...

December 8, 2024 8:20 PM December 8, 2024 8:20 PM

views 10

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात देशात २४,००० कोटी रुपये परदेशी गुंतवणूक

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुमारे २४ हजार कोटी रुपये परदेशी गुंतवणूक देशात आली आहे. गेले २ महिने  परदेशी गुंतवणूक दारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतली होती. मात्र त्या आधी सप्टेंबर २०२४मधे  परदेशी गुंतवणुकीचा त्याआधीच्या ९ महिन्यातला उच्चांक गाठला गेला होता. या वर्षभरात आतापर्यंत परदेशी  गुंतवणूकदारांनी एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक डिबेंचर स्वरुपात केली आहे.