December 30, 2024 8:07 PM December 30, 2024 8:07 PM
2
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचं निधन
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचं काल रात्री जॉर्जियातल्या प्लेन्स इथल्या निवासस्थानी निधन झालं. ते १०० वर्षांचे होते. कार्टर हे १९७७ ते १९८१ या कालावधीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांना २००२ मध्ये शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. ते आतापर्यंतचे सर्वात वयोवृद्ध राष्ट्रपती होते. भारताला भेट देणारे कार्टर हे अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्या सन्मानार्थ हरियाणातल्या एका गावाचं नाव कार्टरपुरी ठेवण्यात आलं. जिमी कार्टर यांनी भारत दौऱ्यावर असताना तत्कालीन प्रधा...