June 6, 2025 8:34 PM June 6, 2025 8:34 PM

views 11

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या, हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेण्यापासून परदेशी विद्यार्थ्यांना थांबवण्याच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या, हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेण्यापासून परदेशी विद्यार्थ्यांना थांबवण्याच्या आदेशाला अमेरिकेतल्या बोस्टन इथल्या न्यायालयानं आज तात्पुरती स्थगिती दिली. ट्रम्प यांचा हा निर्णय बेकायदा असल्याचं सांगून या निर्णयाविरोधात हार्वर्ड विद्यापीठानं न्यायालयात धाव घेतली होती.  

October 10, 2024 10:23 AM October 10, 2024 10:23 AM

views 8

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याकडून प्रधानमंत्र्यांचं कौतुक

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. मोदी उत्तम माणूस आहेत आणि आपले मित्र आहेत असं ट्रम्प यांनी फ्लॅग्रंट पॉडकास्ट या कार्यक्रमात म्हटलं आहे. मोदी यांनी 2019 मध्ये ह्युस्टनला दिलेल्या भेटीतील हाऊडी मोदी या कार्यक्रमाला आपण उपस्थित होतो अशी आठवणही ट्रम्प यांनी सांगितली.

September 18, 2024 5:52 PM September 18, 2024 5:52 PM

views 12

डोनाल्ड ट्रम्प पुढच्या आठवड्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढच्या आठवड्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचं जाहीर केलं आहे. मिशीगनमधे फ्लींट इथं प्रचार मोहिमेतल्या कार्यक्रमात भारत-अमेरिका व्यापाराविषयी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. येत्या २१ ते २३ तारखेदरम्यान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात ट्रम्प त्यांची भेट घेतील अशी शक्यता आहे.