March 30, 2025 8:24 PM March 30, 2025 8:24 PM
2
सीरियात नव्या हंगामी सरकारची शपथ
सीरियात असद कुटुंबाला सत्तेवरून हटवल्यानंतर जवळपास चार महिन्यांनी काल नव्या हंगामी सरकारनं शपथ घेतली. या सरकारमध्ये काळजीवाहू अधिकाऱ्यांच्या जागी जवळच्या सहकाऱ्यांचा समावेश करायची घोषणा सिरीयाचे अंतरिम अध्यक्ष अहमद अल-शरा यांनी केली आहे. सीरियातील ख्रिश्चन अल्पसंख्याक आणि असद यांच्या दीर्घकाळापासून विरोधक असलेल्या ज्येष्ठ नेत्या हिंद कबावत यांची सामाजिक व्यवहार आणि कामगार मंत्री म्हणून नियुक्ती केली गेली आहे. शरा यांनी नेमलेल्या मंत्रिमंडळात स्थान मिळवलेल्या त्या पहिल्या महिला आहेत.