June 10, 2025 3:46 PM June 10, 2025 3:46 PM

views 22

महेंद्रसिंह धोनी आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये विराजमान

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद-आयसीसीनं क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीला आयसीसीच्या प्रतिष्ठेच्या हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट केलं आहे. या वर्षी हा सन्मान मिळवणाऱ्या सात खेळाडूंमध्ये धोनीचा समावेश आहे. कठीण परिस्थितीत असामान्य नेतृत्व करण्याची क्षमता आणि खेळातलं अद्भुत कौशल्य यासाठी धोनीची निवड या सन्मानासाठी केल्याचं आयसीसीनं म्हटलं आहे. आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणं, ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची प्रतिक्रिया महेंद्रसिंह धोनीनं दिली आहे.