August 19, 2024 1:25 PM August 19, 2024 1:25 PM
5
माजी लष्कर प्रमुख जनरल सुंदरराजन पद्मनाभन यांचं निधन
माजी लष्कर प्रमुख जनरल सुंदरराजन पद्मनाभन यांचं आज चेन्नईत निधन झालं.ते ८३ वर्षांचे होते. देहरादूनचं राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालय आणि पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत त्यांचं शिक्षण झालं होतं. त्यांनी अनेक महत्वपूर्ण आघाड्यांवर सैन्याचं नेतृत्व केलं होतं तसंच अनेक युद्धांमध्ये कामगिरी केली होती. पद्मनाभन यांनी काही पुस्तकांचही लिखाण केलं होतं.