June 13, 2025 1:59 PM June 13, 2025 1:59 PM

views 3

परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी नवी दिल्ली इथं चीनच्या उप परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट

परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी नवी दिल्ली इथं चीनचे उप परराष्ट्र मंत्री सन वेइडोंग यांची भेट घेतली आणि भारत-चीन द्विपक्षीय संबंधांमधील घडामोडींवर चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. बैठकीत आर्थिक आणि व्यापारी क्षेत्रात परस्पर संबंधांना आणखी दृढ करण्यावर भर देण्यात आला. यावर्षी कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यासाठी सहकार्य दिल्याबद्दल परराष्ट्र सचिवांनी आनंद व्यक्त केला . त्याचप्रमाणे दोन्ही देशांमधल्या वादग्रस्त विषयांवर सविस्तर चर्चा करून त्याचं निराकर...